शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Iran Protest: आधी तरुणीचा मृत्यू, आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इराणमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 20:16 IST

Iran Protest: शिया कमांडरने 15 वर्षीय सुन्नी मुलीवर बलात्कार केल्यामुळे हिंसाचार भडकला आहे. हिंसाचारात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यूही झाला आहे.

Iran Sunni Girl Rape:इराण हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर हिजाबचा वाद थांबलेला नाही, तोच देश आणखी एका वादाने पेटला आहे. इराणमध्ये एका सुन्नी मुलीवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण चांगलेच तापले आहे. बलुच भागात हिंसक निदर्शने होत आहेत. आंदोलकांनी पोलिस स्टेशनही जाळले. आंदोलकांशी पोलिसांची हिंसक झटापटही झाली. पोलिसांच्या गोळीबारात 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

बलात्कार प्रकरणावरून इराणमध्ये ठिणगी इराणमधील जाहेदान या सुन्नी बहुल शहरात शिया कमांडरच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. कर्नल इब्राहिम नावाच्या शिया कमांडरने 15 वर्षांच्या बलुच मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. इराणचे सुन्नी धर्मगुरू मौलवी अब्दुल हमीद यांनी सुन्नी मुलीवर झालेल्या बलात्काराची पुष्टी केल्यावर इराणच्या आग्नेय भागात निषेध सुरू झाला. लोकांचा राग शुक्रवारच्या नमाजानंतरच रस्त्यावर दिसून आला. बलुच समुदायाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनाला हिंसक वळण लागले. यात लहान मुलांचाही सहभाग होता. हा राग शिया कमांडरवर झालेल्या बलात्काराच्या आरोपाविरोधात असल्याने सरकार आणि पोलीस आंदोलकांच्या निशाण्यावर होते.

हिंसक निदर्शनांमध्ये 36 हून अधिक ठारसुन्नी आंदोलकांनी जाहेदान शहरातील अनेक पोलीस ठाण्यांना घेराव घातला आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या जमावावर गोळीबार सुरू केला. जमावावर झालेल्या या गोळीबारात 36 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गोळीबार आणि त्यात लोकांचा मृत्यू झाल्याने आंदोलकांचा संताप आणखी तीव्र झाला आहे. यानंतर या लोकांनी सरकारी इमारतींपासून ते पोलिस ठाण्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. शिराबाद येथील पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली.

हिंसक निदर्शनात एका कमांडरचाही मृत्यू झालाइराणी पोलीस आणि बलुच आंदोलकांमध्ये झालेल्या या चकमकीत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचा एक कमांडरही ठार झाला. त्यानंतर हा हिंसाचार इराणच्या अनेक शहरांमध्ये पसरला. कुर्दिस्तानमध्ये, आयआरजीसी सैन्याने आंदोलकांवर थेट गोळीबार सुरू केला. निदर्शने आणि हा हिंसाचार थांबवण्यासाठी इराण सरकारने झाहेदानचे इंटरनेट बंद केले, पण तोपर्यंत हा गोंधळ इतर शहरांमध्ये पसरला होता.

कुटुंबावर दबाव आणल्याचा आरोपइराणमधील सुरक्षा दलांनी आपल्या कमांडरला वाचवण्यासाठी पीडित मुलीच्या नातेवाईकांचे अपहरण केले आणि मुलीला काहीही झाले नाही असे विधान करण्यास भाग पाडले, असा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबीयांवर तक्रार नोंदवू नये म्हणून दबावही टाकण्यात आला, मात्र मुलगी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली आणि हे प्रकरण सुन्नी समाजाचे नेते आणि धर्मगुरूंपर्यंत पोहोचताच संपूर्ण बलुच आणि सुन्नी समाज सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला.

टॅग्स :IranइराणInternationalआंतरराष्ट्रीय