शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:21 IST

Iran Oil Refinery Blast: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्धविराम जाहीर होऊन काही तास उलटत नाहीत तोच, इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नुकत्याच सुरू झालेल्या शांतता प्रक्रियेवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

इराण आणि अमेरिका-इस्रायल दरम्यान ४० दिवसांच्या युद्धानंतर बुधवारी सकाळीच १५ दिवसांचा युद्धविराम लागू झाला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. इराणच्या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती इराणच्या 'मेहर' न्यूज एजन्सीने दिली आहे. सीझफायर लागू झाल्यानंतर इराणमधील ही पहिलीच मोठी हिंसक घटना आहे.

फारसच्या आखातात असलेल्या ७८ वर्ग किमी क्षेत्राच्या लावन बेटावर इराणचा मोठा कच्चे तेल निर्यात टर्मिनल आणि 'लावन गॅस क्षेत्र' आहे. इथल्या रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात किती नुकसान झाले आणि हा स्फोट तांत्रिक बिघाडामुळे झाला की तो हल्ला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, युद्धविराम जाहीर झाल्यावर काही तासांतच ही घटना घडल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.दुसरीकडे कुवेतवर ड्रोन हल्ला झाला आहे. कुवेत सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हा हल्ला इराणच्या बाजूने करण्यात आल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे नुकतीच सुरू झालेली शांतता चर्चा धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

इराणचा आक्रमक पवित्राइराणच्या मेहर न्यूजने या घटनेनंतर म्हटले आहे की, "दोन्ही बाजूंनी युद्धविरामाचे पालन करणे अनिवार्य आहे. जर हा स्फोट एखाद्या आक्रमक कारवाईचा भाग असेल, तर इराण त्याचे जोरदार प्रत्युत्तर देईल." इराणच्या या इशाऱ्यामुळे मिडल ईस्टमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.

युद्धविरामाची स्थितीडोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, हा युद्धविराम केवळ दोन आठवड्यांसाठी असून यादरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, लावन बेटावरील या स्फोटामुळे चर्चेच्या वाटेत पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत. आता अमेरिका आणि इस्रायल या घटनेवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धAmericaअमेरिकाIsraelइस्रायल