शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Iran, US News : अमेरिकी लष्करी तळांवर इराणचे क्षेपणास्त्र हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 06:43 IST

Iran, US News : बगदादमध्ये ड्रोन हल्ल्याने हत्या केल्याचा बदला घेण्यासाठी इराणने बुधवारी पहाटे इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ले केले.

तेहरान/बगदाद : प्रभावशाली लष्करी कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची बगदादमध्ये ड्रोन हल्ल्याने हत्या केल्याचा बदला घेण्यासाठी इराणने बुधवारी पहाटे इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ले केले. त्यामुळे अमेरिकाइराणमधील वैमनस्य शिगेला पोहोचले असून, मध्यपूर्वेतील तणावात आणखी भर पडल्याने जगभर चिंता व्यक्त केली गेली. सूडाच्या या आगीने होरपळणाऱ्या इराकने मात्र ‘तुमची भांडणे आमच्या भूमीवर लढू नका’, अशी कळकळीची विनंती केली आहे. बगदादपासून ३०० किमीवरील ऐन-अल असद हवाई आणि उत्तरेकडील इर्बिलजवळील या दोन तळांवर हे हल्ले केले गेले.इराणच्या म्हणण्यानुसार ३०० किमीहून अधिक पल्ला असलेली २२ ‘फतेह-३१३’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पहाटे १.४५ ते २.१५ या अर्ध्या तासात डागण्यात आली. यापैकी १७ क्षेपणास्त्रे ऐन-अल-असद तळावर सोडण्यात आली. त्यातील १५ क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्यवेध केला व दोन भरकटली. इर्बिल तळावर सोडलेल्या पाचही क्षेपणास्त्रांनी अचूक मारा केला. अमेरिकी लष्कराने मात्र १५ क्षेपणास्त्रे तळांवर आल्याचे म्हटले.या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे ८० सैनिक ठार झाले व अनेक हेलिकॉप्टर व अन्य लष्करी साहित्य उद््ध्वस्त करून मोठी हानी करण्यात आली, असा दावा इराणने केला. आणखी हल्ले करण्यासाठी अमेरिका व मित्रपक्षांची १४० ठिकाणे निवडली आहेत. अमेरिकेने पुन्हा आगळिक केल्यास आणखी हल्ले करून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला. अमेरिकेने हे हल्ले झाल्याचे मान्य केले आणि नुकसानीचा नक्की अंदाज घेण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच स्वत:च्या आणि मित्रपक्षांच्या हितांचे परिपूर्णपणे रक्षण करण्यास आपण समर्थ असल्याचेही अमेरिकेने म्हटले.>इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादू - ट्रम्पया पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले की, इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे सैनिक मारले गेले नाहीत. आमचे सैनिक सुरक्षित आहेत. हल्ल्याची आगळीक केलेल्या आणि दहशतवादाला खतपाणी घालणाºया इराणवर आम्ही कडक आर्थिक निर्बंध लादणार आहोत. कोणत्याही स्थितीत आम्ही इराणला अण्वस्त्रे निर्माण करु देणार नाही. मध्यपूर्वेत शांतता कायम राखण्यासाठी ‘नाटो’ देशांनी इकडे लक्ष दिले पाहिजे. रशिया, चीन व युरोपियन देशांनी इराणला मदत करणे थांबवले पाहिजे. इराणला रोखण्यासाठी आणि जागतिक शांततेसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकवटले पाहिजे. भाषणात ट्रम्प यांनी दहशवादी कारवाया करण्यात आघाडीवर असलेल्या इराणचा लष्करी अधिकारी कासिम सुलेमानीला मारल्याचे समर्थन केले.>भारतात पडसाद : या हल्ल्यांनंतर बुधवारी शेअर बाजाराचा सेन्सेक्स व निफ्टी कोसळला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात ४ टक्क्याने वाढ झाली. भारतात सोन्याच्या भावात ८५0 रुपयांनी वाढ झाली आणि चांदीही ५0 हजारांच्या दारात पोहोचली.

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाUSअमेरिका