शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? सौदी अरेबियावर हल्ला करू शकतो इराण, अमेरिकेचे सैन्य हाय अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 08:29 IST

सौदी अरेबियातील अनेक ठिकाणी इराण हल्ले करू शकतो.

सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे इराणसौदी अरेबियावर कधीही हल्ला करू शकतो, असे वृत्त आहे. सौदी अरेबियाने ही गुप्तचर माहिती अमेरिकेला दिली आहे. सौदी अरेबियातील अनेक ठिकाणी इराण हल्ले करू शकतो. ही गुप्तचर माहिती समोर येताच आखाती देशांमध्ये उपस्थित असलेल्या अमेरिकन लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. इराणने सौदी अरेबियावर हल्ला केल्यास जग पुन्हा एका महायुद्धाच्या (World War) तोंडावर येऊ शकते.

अमेरिका आणि सौदी अरेबिया हाय अलर्टवर आहेत, कारण सौदीच्या गुप्तचरांनी अमेरिकेला माहिती दिली आहे की, इराण सौदी अरेबियातील अनेक ठिकाणांवर हल्ला करण्याचा विचार करत आहे, असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच, दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांनी वॉल स्ट्रीट जर्नलसोबत येऊ घातलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

सौदीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सौदी अरेबियाव्यतिरिक्त इराणला इराकच्या एरबिलवर हल्ला करायचा आहे, जिथे अमेरिकन सैन्य आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नियोजित हल्ल्यांचा हेतू इस्लामिक राष्ट्राच्या नेतृत्वाविरोधात इराणमधील निदर्शनांवरून लक्ष हटवण्याचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुप्तचर माहितीची पुष्टी करणार्‍या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा हल्ला 48 तासांच्या आत होऊ शकतो.

अमेरिकेने काय म्हटले?अमेरिकेला त्या भागातील धोक्याच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे आणि सौदी अधिकार्‍यांशी सतत संपर्कात आहोत, असे पेंटागॉनचे प्रेस सचिव, वायुसेना ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, पॅट रायडर यांनी कोणत्याही विशिष्ट धोक्याबाबत सांगण्यास नकार देत सांगितले की, "आम्ही स्वतःचे रक्षण आणि बचाव करण्याचा आमचा अधिकार राखून ठेवू, मग आमचे सैन्य इराकमध्ये किंवा इतरत्र सेवा देत असेल."

याआधीही हल्लादरम्यान, इराण हा सौदी अरेबियाचा प्रमुख प्रादेशिक प्रतिस्पर्धी आहे. रियाधने 2016 मध्ये तेहरानशी अधिकृत राजनैतिक संबंध तोडले होते. त्यावेळी सौदी अरेबियातील एका शिया धर्मगुरूला फाशी दिल्याच्या प्रत्युत्तरात इराणी निदर्शकांनी तेहरानमधील सौदी दूतावासावर हल्ला केला होता. इराण-समर्थित हौथी बंडखोरांनी अलिकडच्या वर्षांत सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधील तेल सुविधांवरही हल्ला केला आहे, ज्यामुळे ऊर्जा पायाभूत सुविधा या क्षेत्रातील कोणत्याही इराणच्या चिथावणीचे लक्ष्य असू शकतात अशी चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Iranइराणsaudi arabiaसौदी अरेबियाAmericaअमेरिका