शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इराणने मोठी चूक केली, अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने ट्रम्प संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 22:17 IST

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव आता कमालीचा वाढला आहे.

वॉशिंग्टन - गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव आता कमालीचा वाढला आहे. दरम्यान, आज इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ड्रोन पाडून इराणने मोठी चूक केली आहे, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेसोबतचा तणाव कायम असतानाच इराणने आज अमेरिकेचे एक शक्तिशाली ड्रोन होर्मुजजवळ पाडले होते. इराणच्या या कृत्यामुळे अमेरिकेचा तीळपापड झाला आहे. इराणच्या या कृत्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी ट्विट करून इराणला इशारा दिला आहे. इराणने एक मोठी चूक केली आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर अमेरिका इराणविरोधात कठोर कारवाई करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध आणि हल्लीच तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यानंतर आखाती क्षेत्रात तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने अमेरिका नाराज झाली आहे.  इराणच्या हवाई क्षेत्रात घुसलेल्या अमेरिकेच्या एका सर्विलान्स ड्रोनला पाडण्यात आले आहे, असे इराण्याचा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले होते. मात्र ही घटना आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात घडल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.  इराणने एमक्य्-4सी हे ट्रायटन विमान पाडून अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे. त्यातच अत्याधुनिक आणि शक्तिशाली असल्याचा दावा करण्यात येत असलेले ड्रोन इराणने पाडल्याने अमेरिकेवर नामुष्की ओढवली आहे. त्यामुळेच अमेरिकेचा अधिक तीळपापड झाला आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIranइराण