शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

"इस्माईल हानियाच्या मृत्यूचा बदला घेणं आमचं कर्तव्य", इराणचे नेते खामेनेई संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 18:35 IST

Ayatollah Ali Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी बुधवारी (३१ जुलै)  इस्माईल हानियाच्या हत्येबाबत भाष्य केलं आहे. 

इराण : गेल्या ९ महिन्यापासून बदल्याच्या आगीमध्ये होरपळणाऱ्या इस्रायलनं हमासचा प्रमुख इस्माईल हानियाला संपवलं आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हमास प्रमुख इस्माईल हानिया यांची हत्या झाल्याची माहिती दिली आहे. इस्रायलनं इराणच्या तेहरानमधील इस्माईल हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला केला. यात इस्माईल हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी बुधवारी (३१ जुलै)  इस्माईल हानियाच्या हत्येबाबत भाष्य केलं आहे. 

इस्माईल हानियाच्या हत्येचा बदल घेण्याची शपथ अयातुल्ला अली खामेनेई यांनी घेतली आहे. तेहरानमध्ये पहाटे झालेल्या हवाई हल्ल्यात इस्माईल हानियाचा मृत्यू झाल्यानंतर इस्रायलनं आपल्या कठोर शिक्षेसाठी तयार राहावं, असं अयातुल्ला अली खामेनेई यांनी सांगितलं. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, अयातुल्ला अली खामेनेई यांनी आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "आम्ही त्यांचा बदला घेणं, हे आमचं कर्तव्य समजतो. हमास प्रमुख इस्माईल हानिया हे आमचे एक प्रमुख पाहुणे होते."

दरम्यान, गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर इतिहासातील सर्वात भीषण हल्ला झाला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून हिंसाचार केला होता. त्यावेळी अनेक निर्दोष नागरिकांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची योजना हमासचा प्रमुख इस्माईल हानिया यानं आखल्याचा आरोप होता. अखेर इस्रायलनं इस्माईल हानियाला ठार केलं. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तो इराणला गेला होता. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं म्हटलं आहे की, तेहरानमधील इस्माईल हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता. ज्यात हमासचा प्रमुख तसेच एक अंगरक्षक ठार झाला होता. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धInternationalआंतरराष्ट्रीय