शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:00 IST

इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनेई संतापले. इस्त्रायलने युद्ध सुरू केले आहे त्यामुळे आता तो युद्धातून बाहेर पडू शकत नाही असं त्यांनी म्हटलं.

इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. या दोन्ही देशातील युद्धात इतर देशही आक्रमक पवित्रा घेत असल्याने हा संघर्ष जागतिक महायुद्धाच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्त्रायलकडून इराणवर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये ७८ लोकांचा जीव गेला तर शेकडो जखमी झालेत. आता इराणनेही इस्त्रायलवर पलटवार करत त्यांच्या सैन्य तळांवर आणि नागरी वस्त्यांवर मिसाईल हल्ले सुरू केलेत. 

या तणावाच्या परिस्थितीत इराणने पाश्चात्य देशांना मोठा इशारा दिला आहे. इराणने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, पाश्चात्य देशांनी जर इस्त्रायलला मदत केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. जर पाश्चात्य देशांनी इस्त्रायलवर होणारे इराणी हल्ले रोखण्यास मदत केली तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सच्या सैन्य ठिकाणांवर आणि त्यांच्या युद्धनौकांवर टार्गेट हल्ला करण्यात येईल असं बजावले आहे. 

नेतन्याहू यांचं इराणच्या जनतेला आवाहन

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या जनतेला हुकुमशाही सत्ता उखडून फेकण्याचे आवाहन केले आहे. नेतन्याहू यांनी लोकांना हुकुमशाहीविरोधात उभे राहण्याचं म्हटले. इस्त्रायलची लढाई तुमच्याशी नाही तर तिथल्या हुकुमशाही सत्तेची आहे. इस्त्रायलची सैन्य कारवाई इराणच्या लोकांना स्वातंत्र्यासाठी मार्ग मोकळा करेल असं त्यांनी म्हटलं. 

खामेनेई भडकले 

इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनेई संतापले. इस्त्रायलने युद्ध सुरू केले आहे त्यामुळे आता तो युद्धातून बाहेर पडू शकत नाही. इस्त्रायल त्याच्या गुन्ह्यापासून वाचू शकत नाही. इस्त्रायलसाठी नर्काचे दरवाजे उघडतील. आम्ही त्यांना बर्बाद करू अशी धमकी खामेनेई यांनी दिली आहे. इराणकडून इस्त्रायलवर होणाऱ्या कारवाईला ऑपरेशन टू प्रॉमिस ३ नाव देण्यात आले आहे तर इस्त्रायलकडून इराणच्या हल्ल्यांसाठी ऑपरेशन राइजिंग लायन असं नाव देण्यात आले आहे. 

इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश

दरम्यान, इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर, दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्त्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही ड्रोन हल्ले सुरू झाले.  मात्र इराणी ड्रोन हाणून पाडण्यासाठी जॉर्डनकडून इस्रायली सैन्याला विशेष मदत मिळाली आहे. जॉर्डन हा इस्रायलचा खास सहकारी आहे आणि त्याला सातत्याने मदत करत असतो. जॉर्डनने १९९४ मध्ये इस्रायलसोबत शांतता करार केला आहे. असे करणारा तो दुसरा अरब देश बनला. तेव्हापासून जॉर्डनचे इस्रायलसोबत अत्यंत जवळचे गुप्तचर आणि सुरक्षा संबंध आहेत.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाFranceफ्रान्स