शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:30 IST

हा प्रस्ताव अशावेळी पुढे आला आहे जेव्हा इराण-इस्त्रायल संघर्ष शिगेला पोहचला आहे. या प्रस्तावातून इराणची छुपी रणनीती पुढे आली आहे.

तेहरान - इस्त्रायली हल्ल्यावेळी इराणच्या टॉप अधिकाऱ्याने इस्लामिक सेना बनवण्याची मागणी केली आहे. तुर्की, सौदी अरब, पाकिस्तानकडे इस्त्रायलविरोधात लढण्यासाठी इस्लामिक सेना बनवण्याचं आवाहन इराणने केले आहे. या प्रमुख इस्लामिक देशांसोबत इतर देशांनी इस्त्रायल विरुद्ध इराणची साथ देण्यासाठी इस्लामिक सेना बनवण्याची मागणी इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे वरिष्ठ सैन्य अधिकारी मोहसेन रेजाई यांनी केली आहे.

रेजाई यांनी इराणी मीडियाला मुलाखत दिली आहे. त्यात ते म्हणाले की, तुर्की, सौदी अरब आणि पाकिस्तानसारख्या प्रमुख इस्लामी देशांनी एकत्र येऊन संयुक्त इस्लामिक सैन्य बनवायला हवे. ज्याचा हेतू इस्त्रायलविरोधात एकजूट दाखवणे आहे. सध्या सुरू असलेले युद्ध नियोजित संघर्ष आहे जो इस्लाम जगतात एकत्रितपणे जिंकले जाऊ शकते असं त्यांनी सांगितले आहे. हा प्रस्ताव अशावेळी पुढे आला आहे जेव्हा इराण-इस्त्रायल संघर्ष शिगेला पोहचला आहे. या प्रस्तावातून इराणची छुपी रणनीती पुढे आली आहे. मुस्लीम देशांना भावनात्मक एकत्र करून स्वत:ला संरक्षित करायचे आहे. 

तुर्की, पाकिस्तानची इराणला साथ

इतकेच नाही तर पाकिस्तानने आम्हाला आश्वासन दिलंय की, जर इस्त्रायल इराणवर अणुहल्ला करेल तर ते इस्त्रायलवर अणुबॉम्ब टाकतील असा दावा रेजाई यांनी केला आहे. १४ जूनला देशाच्या संसदेत पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मुस्लीम देशांना इस्त्रायलविरोधात एकजूट होण्याचं आवाहन केले होते. इस्त्रायलने इराण, यमन आणि पॅलेस्टाईनला टार्गेट केले. जर मुस्लीम देश एकजूट झाले नाही तर प्रत्येकाची हीच अवस्था होईल. इस्लामिक सहयोग संघटनेनेन प्रत्युत्तर कारवाईसाठी संयुक्त रणनीती आखण्याची गरज असल्याचे पाकिस्तानने म्हटलं होते. 

तुर्की आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जगात प्रभावशाली सैन्य आणि आर्थिक ताकद असल्याचे मानले जाते. परंतु त्यांचे परराष्ट्र धोरण खूप गुंतागुतीचे आहे. तुर्की आणि सौदी अरब एकमेकांविरोधात असतात. तुर्कीने भलेही पॅलेस्टाईन समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली असली तरी नाटो सदस्यता, इस्त्रायलसोबत सैन्य तंत्रज्ञान संबंध त्याला थेट युद्धात जाण्यापासून रोखतात. सौदी अरब अलीकडेच अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्त्रायलसोबत संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे सौदी तूर्तास कुठलाही निर्णय घेत नाही. त्यामुळे या सर्व देशांनी एकत्रित येऊन सैन्य बनवणे प्रत्यक्षात कितपत खरे ठरेल हा प्रश्नच आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलPakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबियाMuslimमुस्लीम