शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ५०० सेकंदांत इस्रायल...! इराणने १८ वर्षांपासून लपवून ठेवलेले डान्सिंग क्षेपणास्त्र बाहेर काढले, तेल अवीवमध्ये पळापळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 08:43 IST

Iran Sejjil Missile Attack: इराणने प्रथमच इस्रायलविरुद्ध सेजिल क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. २००० किमी पल्ला असलेल्या या शस्त्राची ताकद काय आहे? वाचा सविस्तर.

आखाती युद्धाच्या १७ व्या दिवशी इराणने आपल्या ताफ्यातील सर्वात घातक शस्त्राचा वापर करत इस्रायलला मोठा हादरा दिला आहे. इराणने या युद्धात पहिल्यांदाच 'सेजिल ' या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने इस्रायलवर हल्ला केला आहे. या क्षेपणास्त्राच्या समावेशामुळे मध्य आशियातील युद्धाने आता अत्यंत भीषण रूप धारण केले आहे.अमेरिका अन् इराण...! दोघेही एकाच देशावर करतायत हल्ले; दोघांच्या भांडणात हा देश होरपळला...

हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा १२ ते १४ पटीने जास्त वेगाने प्रवास करू शकते. इराणपासून इस्रायलचे अंतर पार करण्यासाठी या क्षेपणास्त्राला केवळ ७ ते ८ मिनिटे (सुमारे ५०० सेकंद) लागतात. याची मारक क्षमता २००० ते २५०० किलोमीटरपर्यंत आहे, ज्यामुळे संपूर्ण इस्रायल आणि युरोपचा काही भाग याच्या टप्प्यात येतो. हे दोन टप्प्यातील 'सॉलिड फ्युएल' वर चालणारे क्षेपणास्त्र आहे. घन इंधनामुळे हे क्षेपणास्त्र अतिशय कमी वेळात प्रक्षेपित करता येते, ज्यामुळे शत्रूच्या रडारला सावध होण्याची संधी मिळत नाही.

इस्रायलची 'आयर्न डोम' यंत्रणा धोक्यात?इराणचा दावा आहे की, 'सेजिल'चा वेग आणि त्याची दिशा बदलण्याची क्षमता यामुळे इस्रायलची 'आयर्न डोम' किंवा 'अॅरो' ही संरक्षण यंत्रणा भेदणे सोपे आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये हाय-अलर्ट घोषित करण्यात आला असून नागरिकांना बंकरमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इराणी माध्यमांनुसार, सेजिल हा शब्द कुराणातील सुरा अल-फीलमधील एका कथेशी जोडला गेला आहे, ज्यामध्ये सेजिल नावाच्या दगडांनी हल्ला करणाऱ्या शत्रूच्या नाशाबद्दल सांगितले आहे. २००८ मध्ये पहिल्यांदा या मिसाईलची चाचणी घेण्यात आली होती.

युद्धाचा नवा टप्पाइराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकेने किंवा इस्रायलने त्यांचे हल्ले थांबवले नाहीत, तर यापेक्षाही घातक क्षेपणास्त्रांचा वापर केला जाईल. या नव्या शस्त्राच्या वापरामुळे आता जागतिक महासत्तांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran unveils 'dancing missile,' Israel panics: 500 seconds to strike!

Web Summary : Iran launched its 'Sejjil' missile at Israel, capable of reaching in 500 seconds. It threatens Israel's defense systems, escalating Middle East tensions. High alert declared.
टॅग्स :IranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्धIsraelइस्रायल