शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:36 IST

ट्रम्प यांनी इराण-इस्त्रायल युद्धात उतरायला २ आठवड्याचा वेळ का घेतला? हे समजून घेण्याआधी या युद्धात रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांनी काय म्हटलंय हे जाणून घेतले पाहिजे

इराण-इस्त्रायल युद्धाचा शेवट काय असेल हे ठरवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी २ आठवड्याचा वेळ घेतला आहे. अमेरिकेकडून या २ आठवड्यात विविध राजनैतिक आणि सर्व पर्यायांवर विचार करण्यात येईल. या कालावधीत चर्चा आणि दबावतंत्राचा वापर करण्यात येईल. सैन्य हस्तक्षेपाचा पर्याय खुला ठेवला आहे. या २ आठवड्यात अमेरिकाइराणवर सैन्य कारवाई करायची की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचे गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 

सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध निर्णायक वळणावर आले आहे. इस्त्रायलने इराणचे टॉप सैन्य नेतृत्व संपवले होते. इस्त्रायलने इराणच्या एरियल स्पेसवर जवळपास कब्जा केला होता. इराणचे टॉप न्यूक्लियर वैज्ञानिक मारले गेले होते. अशा स्थितीत इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेने एन्ट्री घेणे इतके सोपे नाही असं विधान ट्रम्प प्रशासनाकडून आले आहे. या निर्णयावरून ट्रम्प यांच्यावर देशातंर्गत आणि जागतिक पातळीवर दबाव आहे. ट्रम्प यांनी इराणला इशारा देत तिथले सर्वोच्च नेते खामेनेई यांना विना अट सरेंडर करण्यास म्हटले होते. इराणचा सुप्रीम लीडर कुठे लपलाय हे अमेरिकेला माहिती आहे. सहजपणे त्याला टार्गेट करू शकतो परंतु अमेरिका असे करणार नाही. इराणने इस्त्रायली नागरीक आणि अमेरिकन सैन्य तळांवर हल्ला करण्याची चूक करू नये असं ट्रम्प यांनी बजावले. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाकडून व्हाईट हाऊसने दिलेले निवेदन हैराण करणारे आहे.

ट्रम्प यांनी इराण-इस्त्रायल युद्धात उतरायला २ आठवड्याचा वेळ का घेतला? हे समजून घेण्याआधी या युद्धात रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांनी काय म्हटलंय हे जाणून घेतले पाहिजे. इराण-इस्त्रायल युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रशियाने संयमी भूमिका घेतली. परंतु ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळे रशियाने भूमिका बदलली. अमेरिकेने इराणवर हल्ला करू नये असं पुतिन यांनी म्हटले. अमेरिकेने या युद्धापासून दूर राहण्याचा सल्ला रशियाचे परराष्ट्र मंत्री यांनी दिला. इराणवर जर हल्ला झाला तर मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण होईल असं रशियाने म्हटले आहे. रशिया इराणचा प्रमुख सैन्य आणि आर्थिक भागीदार देश आहे. रशियाने आतापर्यंत S 300 मिसाईल, डिफेन्स सिस्टम आणि सैन्य साहित्य इराणला दिले आहे. इराणमध्ये जर सत्ता परिवर्तन घडले तर पश्चिम आशियात रशिया कमकुवत होईल. या भागात इराणचे कमकुवत होणे म्हणजे अमेरिका-इस्त्रायल यांचा दबदबा वाढण्यासारखे आहे. सीरियातून असद पायउतार झाल्यानंतर इराण रशियासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे रशिया इराणमध्ये अमेरिकेच्या कुठल्याही सैन्य कारवाईविरोधात आहे. 

चीननेही इराण-इस्त्रायल संघर्षावर चिंता व्यक्त केली. दोन्ही देशांनी संयम बाळगावा, तणाव कमी करण्याचे आवाहन चीनने केले. या दोन्ही देशात मध्यस्थी करण्याची भूमिकाही चीनने घेतली. चीन इराणचा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. या दोन्ही देशांमध्ये मजबूत आर्थिक संबंध आहेत. चीन इराणला आर्थिक आणि तंत्रज्ञान मदत करते. जर अमेरिका थेट या युद्धात उतरला तर चीनकडून इराणला मदत मिळण्याची शक्यता आहे. अनेक माध्यमातून चीन इराणच्या मदतीसाठी पुढे येईल. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्यासाठी पुतिन आणि जिनपिंग यांच्यात फोनवर दीर्घकाळ चर्चा झाली. 

उत्तर कोरियाचा इशारा

उत्तर कोरिया आणि अमेरिकेची दुश्मनी जगजाहीर आहे. उत्तर कोरियाने इस्त्रायली हल्ल्याचा निषेध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. उत्तर कोरिया आणि इराण यांच्यात मिसाईल आणि सैन्य मदतीचा जुना इतिहास आहे. उत्तर कोरियानेच इराणला बॅलेस्टिक मिसाईल आणि अन्य सैन्य साहित्य पुरवले. ज्यातून दोन्ही देशांतील संबंध वाढले. त्यामुळे जर अमेरिका या युद्धात उतरला तर उत्तर कोरियाही मैदानात येईल. ही सर्व परिस्थिती पाहता इराण युद्धात उतरण्याचा निर्णय घेण्यासाठी ट्रम्प यांनी १५ दिवसांचा वेळ घेतला आहे. या कालावधीत अमेरिका युद्धात उतरल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेत आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनchinaचीन