शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 21:22 IST

Iran Israel War: इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यासह काही बडे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांचा खात्म करण्याची रणनीती इस्राइलने आखली आहे. त्यासाठी इराणने मोस्ट वाँटेड नेते आणि अधिकाऱ्यांची एक यादीच प्रसिद्ध केली आहे.

मागच्या वर्षभरापासून हमाससोबत संघर्ष सुरू असतानाचा गेल्या काही दिवसांमध्ये इस्राइलने इराणचं पाठबळ असलेल्या हिजबुल्लाह या संघटनेला लक्ष्य करून तिच्या अनेक बड्या नेत्यांना ठार मारले आहे. इस्राइलच्या या कारवाईमुळे इराणचा तीळपापड झाला असून, सोमवारी रात्री इराणने इस्राइलवर शेकडो क्षेपणास्त्रांसह जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, इस्राइलला अद्दल घडवण्याचा चंगच इराणने बांधल्याचे संकेत मिळत असून, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह काही बडे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा करण्याची रणनीती इराणने आखली आहे. त्यासाठी इराणने मोस्ट वाँटेड नेते आणि अधिकाऱ्यांची एक यादीच प्रसिद्ध केली आहे. 

इराणच्या गुप्तचर मंत्रालयाने इस्राइलमधील मोस्ट वाँटेड नेते आणि अधिकाऱ्यांची ही यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह त्यांच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित प्रमिख अधिकाऱ्यांचा खात्मा करण्याची धमकी देण्यात आली आहे. इराणच्या गुप्तचर विभागाने ही धमकी हिब्रू भाषेमधून प्रसिद्ध केली आहे. या फोटोमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांचं नाव सर्वात वर आहे. त्यानंतर संरक्षणमंत्री योआव गेलेंट आणि लष्करप्रमुख हर्जी हलेवी यांचं नाव आहे.

दरम्यान, काल रात्री इराणने इस्राइलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील तसेच मध्य पूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे. मात्र इराणच्या हल्ल्यानंतरही इस्राइलचा आक्रमकपणा कायम असून इस्राइलने मागच्या १२ तासांत लेबेनॉनवर सहा वेळा एअरस्ट्राइक केली आहे. तसेच प्रत्यक्ष जमिनीवरून हल्ला करण्याचे आदेशही सैनिकांना देण्यात आले आहेत. प्रत्युत्तरदाखल लेबेनॉननेही इस्राइलवर १०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. दरम्यान, इस्राइलच्या लष्कराचे सैनिक आणि हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांमध्ये समोरासमोर झालेल्या चकमकींमध्ये इस्राइलच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार इस्राइलवर हल्ला करण्यासाठी इराणकडून वापरण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये इराणच्या आतापर्यंतच्या सर्वात आधुनिक हत्यारांचाही समावेश होता. तसेच इराणकडून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्रांमध्ये फतह क्षेपणास्त्राचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.  

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय