शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 08:37 IST

Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे उच्च लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू

Iran Israel War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता नवी दिशा घेतली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची सुरुवात झाली आहे. इराणविरुद्ध 'ऑपरेशन रायझिंग लायन' सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव सुरूच आहे. शनिवारी रात्रीही दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केला. शनिवारी रात्री इस्रायली हवाई दलाने इराणच्या इतर भागांसह राजधानी तेहरानवरही हल्ला केला. या हल्ल्यात तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, न्यूक्लियर प्रयोगशाळा, न्यूक्लियर मुख्यालय ( nuclear headquarters ) आणि दोन रिफायनरीजना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यानंतरच्या छायाचित्रांमध्ये आग आणि मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येते. त्यानंतर प्रत्युत्तरात इराणने इस्रायली बंदर शहर हैफासह संपूर्ण इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात उच्च लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांचा ( nuclear scientist ) मृत्यू झाला.

इस्रायलचा दावा

इस्रायलने म्हटले आहे की ते इराणचा अणु कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, जो त्यांच्या अस्तित्वासाठी धोका मानतो. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने ट्विट केले की, "IDF ने तेहरानमधील इराणी राजवटीच्या अण्वस्त्र प्रकल्पाशी संबंधित लक्ष्यांवर अनेक हल्ले केले आहेत. या लक्ष्यांमध्ये इराणी संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय, SPND अण्वस्त्र प्रकल्पाचे मुख्यालय आणि अण्वस्त्रे विकसित करण्याच्या इराणी राजवटीच्या प्रयत्नांना चालना देणारी इतर ठिकाणे आणि इराणी राजवटीने आपले अण्वस्त्रे लपवलेली ठिकाणे यांचा समावेश होता." इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की त्यांचे सैन्य अयातुल्ला राजवटीच्या प्रत्येक ठिकाणावर हल्ला करेल.

इराणकडून प्रतिहल्ला

दुसरीकडे इराणने त्यांच्या न्यूक्लियर आस्थापनांवर, हवाई संरक्षण यंत्रणेवर आणि इतर लक्ष्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने म्हटले आहे की, त्यांनी इस्रायलच्या ऊर्जेशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. इस्रायली आपत्कालीन सेवेने सांगितले की, हल्ल्यांमध्ये देशाच्या उत्तरेकडील भागात किमान तीन लोक ठार झाले आहेत.

इराणने अमेरिकेसोबतची अणु चर्चा रद्द केली

रविवारी इराणने एका महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या अणु चर्चा स्थगित केल्या कारणामुळे वादंग निर्माण झाला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, इस्रायलच्या हल्ल्यांनंतर चर्चा करणे 'अयोग्य' ठरेल. दरम्यान, इराणी सरकारी टेलिव्हिजनने सांगितले की शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. या घडामोडींनंतर, असे दिसते की ही लढाई बराच काळ चालू शकते.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धnuclear warअणुयुद्ध