शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 21:03 IST

Iran Israel War: अमेरिकेचे बंकर-बस्टर बॉम्ब ही विमाने टाकू शकतात. आता अमेरिकेतून या विमानांनी एवढ्या मोठ्या संख्येने झेप घेतल्याने इराणवरे अमेरिकेचा हल्ला आता निश्चित मानला जात आहे.

इराणच्या डोंगराळ भागातील भूमिगत असलेल्या अण्वस्त्र प्रकल्पाला केवळ अमेरिकाच उध्वस्त करू शकते. इस्रायलने किती जरी क्षेपणास्त्रे आदळवली तरी देखील हा अण्वस्त्र प्रकल्प नष्ट करू शकत नाही. यामुळे सुमारे ३० इंधन पुरवठा विमाने इराणकडे गेलेली असताना आता अमेरिकेची सर्वात शक्तीशाली मानली जाणारी ६ बी-2 बॉम्बर विमाने देखील मध्य पूर्वेच्या दिशेने झेपावली आहेत. 

अमेरिकेचे बंकर-बस्टर बॉम्ब ही विमाने टाकू शकतात. आता अमेरिकेतून या विमानांनी एवढ्या मोठ्या संख्येने झेप घेतल्याने इराणवरे अमेरिकेचा हल्ला आता निश्चित मानला जात आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या फ्लाइट ट्रॅकिंग डेटा आणि ऑडिओ कम्युनिकेशन्सनुसार अमेरिकेतील मिसूरी येथील व्हाइटमन एअर फोर्स बेसवरून ग्वाममधील यूएस एअर फोर्स बेसवर ही विमाने जाताना दिसली आहेत. फॉक्स न्यूजने याचे वृत्त दिले आहे. मिसूरीहून उड्डाण केल्यानंतर या बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी पॅसिफिक महासागरावर हवेतच इंधन भरले. 

विमानात मोठा पेलोड असल्याने जास्त इंधन न घेताच ही विमाने झेपावली होती. यामुळे या विमानांमध्ये बंकर-बस्टर बॉम्ब असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बी-२ स्टील्थ फायटर विमान एकावेळी दोन बंकर बस्टर बॉम्ब घेऊन जाऊ शकते. सध्यातरी केवळ अमेरिकेकडेच हे बॉम्ब आहेत. अणुस्थळ फोर्डोला हेच बॉम्ब नष्ट करू शकतात. परंतू त्यासाठी सातत्याने बॉम्बफेक करावी लागणार आहे. यामुळे अमेरिकेने दोन ते तीन विमानवाहू युद्धनौका इराणच्या दिशेने पाठविल्या आहेत. तसेच ३० हून अधिक इंधनवाहू विमाने देखील पाठविली आहेत. हा एवढा तामझाम इराणला घाबरविम्यासाठी तर नक्कीच नाहीय. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आतादेखील अणुकरारावर स्वाक्षरी करू शकतो, परंतू कमी वेळ उरला असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी इस्रायल इराणच्या या भूमीगत भागावर हल्ला करून ते नष्ट करू शकत नाही असेही म्हटले होते. यामुळे इराणकडे आता खरोखरच कमी वेळ शिल्लक असल्याचे दिसत आहे. 

 

 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका