शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 06:04 IST

Iran Israel ceasefire news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमधील युद्ध २४ तासांत संपेल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराण आणि इस्रायल दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी सहमत झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

Donald Trump Iran Israel Ceasefire news: इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधीसाठी एकमत झाले आहे. पुढील १२ तासांत १२ दिवसांचे युद्ध संपले असे अधिकृत समजले जाईल.१२ दिवसांच्या या युद्धाला जग सलाम करेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

इस्रायलने पहिल्यांदा इराणवर हल्ला केला होता. इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा केंद्रे आणि लष्करी तळावर हवाई हल्ले केले. त्यामुळे खवळलेल्या इराणने इस्रायलवर पलटवार केला. दोन्ही देशांतील संघर्ष विकोपाला गेला. त्यात अमेरिकेनेही इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हवाई हल्ले केले. त्यानंतर आता अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

"सर्वांचे अभिनंदन! पुढील १२ तासांत संपूर्ण युद्ध थांबवले जाईल, या मुद्द्यावर इराण आणि इस्रायलचे एकमत झाले आहे. (आतापासून जवळपास ६ तासांनंतर जेव्हा इस्रायल आणि इराण आपापली उद्दिष्टे पूर्ण करतील.) त्यानंतर युद्ध संपले आहे असे मानले जाईल", असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

"अधिकृतपणे इराण युद्धविरामाची सुरूवात करेल, तर १२ तासांनंतर इस्रायल. आणि २४ तासांनी १२ दिवसांचे युद्ध संपल्याबद्दल जगाकडून सलाम केला जाईल. या शस्त्रसंधीदरम्यान, दुसरा देश शांतता आणि सन्मान राखेल.    या आधारावर की सर्व काही तसेच होईल, जसे व्हायला हवे. मी दोन्ही देशांना, इस्रायल आणि इराणचे अभिनंदन करतो की, त्यांच्याकडे १२ दिवसांचे युद्ध संपवण्यासाठी सहनशक्ती, धाडस आणि बुद्धिमत्ता आहे", असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

"हे एक असे युद्ध आहे, जे अनेक वर्षे चालले असते आणि पूर्ण मध्य पूर्व आशियाला नष्ट करू शकले असते. पण, असे झाले नाही आणि तसे कधीही होणार नाही. ईश्वराची कृपा इस्रायलवर राहो, ईश्वराची कृपा इराणवरही राहो. मध्य पूर्वला ईश्वराचा आशीर्वाद मिळो. ईश्वर अमेरिकेला आणि संपूर्ण जगाला आशीर्वाद देवो", असे म्हणत ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणIsraelइस्रायलwarयुद्धAmericaअमेरिका