शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

"इस्रायली सेनेने गाझामध्ये पाऊल जरी ठेवले तरी..."; इराणचा मुख्य कमांडर हुसेन सलामी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 17:20 IST

इस्रायल-हमास युद्धामध्ये आता इराणदेखील सक्रीय सहभाग नोंदवताना दिसतेय

Israel Hamas War, Iran Warning: इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मुख्य कमांडर मेजर जनरल हुसेन सलामी यांनी इस्रायलला धमकी दिली आहे. जर जमिनीवर युद्ध झाले तर इस्रायली सैन्याचा दारुण पराभव होईल, असे सलामीने म्हटले आहे. इस्रायली सैन्याला गाझा ड्रॅगन खाऊन टाकेल. इस्रायलींनी गाझामध्ये पाऊल ठेवले तर त्यांना तिथेच पुरले जाईल. गाझा ही अशी जादुची काठी आहे, शत्रुला लगेच गिळंकृत करेल. अशा स्थितीत इस्रायलने गाझामध्ये जमिनीवर लढा द्यायचा विचार करू नका.

मेजर जनरल हुसेन सलामी यांनी म्हटले आहे की, गाझामध्ये जे काही घडत आहे ते मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. सलामी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला, विशेषत: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. जगाने गाझाकडे बघून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे ते म्हणाले.

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही इस्रायलला इशारा दिला

गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर इराणकडून सातत्याने वक्तव्ये येत आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लायान यांनी म्हटले आहे की, गाझामध्ये सुरू असलेली लढाई थांबवली नाही तर ती पॅलेस्टाईनच्या बाहेरही पसरेल. अमेरिकेवर निशाणा साधत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या युद्धाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले. पॅलेस्टाईनमध्ये असेच हल्ले होत राहिले तर तेही त्यातून सुटू शकणार नाही, हे अमेरिकेनेही समजून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.अमेरिका आणि इस्रायलने गाझामधील नरसंहार ताबडतोब थांबवला नाही तर संपूर्ण प्रदेश नियंत्रणाबाहेर जाईल, असे अमीर अब्दुल्लायान यांनी यापूर्वी म्हटले होते. ज्याचे परिणाम दूरगामी आणि अत्यंत वाईट असतील. त्याचबरोबर गाझाला मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही इराण मुस्लिम देशांना करत आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून 1400 लोकांना ठार केले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलकडून गाझावर सातत्याने बॉम्बफेक करण्यात येत आहे. यापेक्षाही मोठे संकट गाझामध्ये निर्माण झाले आहे. इराणसह अनेक देश यावर सातत्याने चिंता व्यक्त करत आहेत आणि हल्ले थांबवण्याचे आवाहन करत आहेत.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIranइराणIsraelइस्रायलBombsस्फोटके