शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेविरोधात इराणने ठोठावला संयुक्त राष्ट्राचा दरवाजा, आता न्यायालयीन लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 17:39 IST

इराणशी केलेल्या अणूकरारातून अमेरिका बाजूला होईल असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मे महिन्यात स्पष्ट केले.

द हेग, नेदरलँडस- अमेरिकेच्या डोनल्ड ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात इराणने संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे आता न्यायालयात लढाईचा निर्णय इराणने घेतला आहे.इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसकडे इराणने जुलै महिन्यातच तक्रार दाखल केली. 1955 साली इराण व अमेरिका यांच्यामधील ट्रीटी ऑफ अमायटी कराराचे 8 मे रोजी ट्रम्प प्रशासनाने निर्बंध लादून उल्लंघन केले अशी तक्रार इराणने केली आहे.या निर्बंधांचे कायदेशीर स्थान तपासून पाहावे तसेच ही निर्बंध इराणच्या हिताच्या दृष्टीने तात्काळ रद्द करावेत अशी मागणी इराणने न्यायालयात केली आहे. इराणशी केलेल्या अणूकरारातून अमेरिका बाजूला होईल असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मे महिन्यात स्पष्ट केले. तसेच इराणवर पुन्हा निर्बंध लादण्याची घोषणाही त्यांनी केली. इराणशी संबंध ठेवणाऱ्या इतर देशांनाही परिणाम भोगावे लागतील अशा सूचना अमेरिकेने इतर देशांना दिल्या. तसेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीपर्यंत सर्व देशांनी इराणकडून होणारी तेल आयात थांबवावी असेही अमेरिकेने या देशांना सांगितले होते.इराणची बाजू मांडणारे मोहसेन मोहेबी यांनी कोर्टाला सांगितले, 'ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे 1955 सालच्या कराराचा भंग आहे आणि त्यामागे इराणच्या अर्थव्यवस्थेचे शक्य तितके नुकसान करण्याचा उद्देश आहे.'2015 साली इराणशी करण्यात आलेल्या अणुकरारामुळे इराणच्या अणूकार्यक्रमावर बंधने लादण्यात आली आणि त्याबदल्यात अमेरिकेने लादलेले निर्बंध मागे घेतले. तसेच इतर आंतरराष्ट्रीय निर्बंधही मागे घेण्यात आले होते.मात्र या करारात इराणच्या बॅलिस्टिक मिसाइल प्रोग्राम आणि मध्यपूर्वेत सीरिया व इतर देशांमध्ये इराणच्या हालचालींचा यामध्ये समावेश नव्हता. त्यामुळे ट्रम्प यांनी या कराराचा नेहमीच विरोध केला होता. हा अत्यंत वाईट करार आहे असं त्यांचं मत आहे. आपली बाजू मांडताना मोहाबी म्हणाले,'' इराणवर पुन्हा निर्बंध लादणे अयोग्य आहे. 2015 च्या कराराच्या सर्व नियमांचे पालन इराण करत आहे. हे निर्बंध इराणची अर्थव्यवस्था आणि समाजाला अस्थिर करत आहेत. त्यामुळे मध्यपूर्वेत अस्थैर्य येऊ शकते.'' हा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या न्यायकक्षेत येतच नाही अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. मंगळवारी अमेरिका आपली बाजू मांडणार आहे.

टॅग्स :IranइराणUSअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प