इराणमध्ये अणु शास्त्रज्ञाला फाशी

By Admin | Updated: August 8, 2016 04:24 IST2016-08-08T04:24:00+5:302016-08-08T04:24:00+5:30

इराणचे अणुशास्त्रज्ञ शाहराम अमिरी यांना फाशी दिल्याच्या वृत्ताला रविवारी दुजोरा देण्यात आला. अमिरी यांनी देशाच्या अणु कार्यक्रमाची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर

Iran hangs nuclear scientist | इराणमध्ये अणु शास्त्रज्ञाला फाशी

इराणमध्ये अणु शास्त्रज्ञाला फाशी

तेहरान : इराणचे अणुशास्त्रज्ञ शाहराम अमिरी यांना फाशी दिल्याच्या वृत्ताला रविवारी दुजोरा देण्यात आला.
अमिरी यांनी देशाच्या अणु कार्यक्रमाची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला दिली असा त्यांच्यावर आरोप होता. इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘इर्ना’ ने इराणच्या न्यायसंस्थेचे प्रवक्ते घोलामहुसेन मोहसेनी एजेही यांच्या हवाल्याने अमिरी यांना फाशी दिल्याचे वृत्त दिले. ही फाशी कधी व कुठे दिली गेली याचा उल्लेख वृत्तात नाही.

Web Title: Iran hangs nuclear scientist