सध्या जगाचे लक्ष इराणवर होणाऱ्या हवाई हल्ल्यांवर असले तरी, समुद्राच्या खोल पाण्यात इराणने एक असे जाळे विणले आहे ज्याने अमेरिकन नौदलासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. इराणच्या 'घादिर क्लास' या चिमुकल्या पण अत्यंत घातक पाणबुड्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझला शत्रूंसाठी 'किल झोन' बनवले आहे.
घादिर ही इराणची स्वदेशी बनावटीची मिनी पाणबुडी आहे. केवळ २९ मीटर लांब असलेली ही पाणबुडी उथळ पाण्यात लपून राहण्यासाठी माहीर आहे. होर्मुझच्या समुद्राची सरासरी खोली अवघी ३६ मीटर असल्याने, मोठ्या अमेरिकन पाणबुड्या तिथे जाऊ शकत नाहीत. मात्र, घादिर तिथे सहज वावरू शकते.
अदृश्य राहण्याची ताकदया पाणबुडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही समुद्राच्या तळाशी शांतपणे बसू शकते. इंजिन बंद केल्यावर सोनार सिस्टीममध्ये ही एखाद्या खडकासारखी दिसते. समुद्रातील लाटांचा आणि इतर जहाजांच्या आवाजामुळे अमेरिकन सोनारला या पाणबुडीचा शोध लावणे अशक्य झाले आहे.
विनाशक शस्त्रेआकाराने लहान असूनही घादिर अत्यंत शक्तिशाली आहे. यामध्ये 'हूट' नावाचे सुपरकॅविटेटिंग टॉरपीडो आहेत, ज्यांचा वेग ताशी ३६० किलोमीटर इतका प्रचंड आहे. या वेगामुळे एखादे विमानवाहू जहाजही स्वतःचा बचाव करू शकत नाही. याशिवाय ही पाणबुडी क्रूझ मिसाईल्स डागू शकते आणि समुद्रात सुरुंग पेरून अख्खा मार्ग रोखून धरू शकते.
अमेरिकेवर झालेला परिणामया चिमुकल्या पाणबुड्यांच्या धोक्यामुळे अमेरिकन विमानवाहू युद्धनौका इराणच्या सागरी हद्दीपासून लांब ठेवण्यात आल्या आहेत. इराणकडे अशा २० हून अधिक सक्रिय पाणबुड्या असून, त्या अमेरिकेच्या अद्ययावत तंत्रज्ञानाला कडवे आव्हान देत आहेत. इराणची ही 'कमी खर्चात मोठा धमाका' करण्याची रणनीती सध्या यशस्वी ठरताना दिसत आहे.
Web Summary : Iran's Ghdir-class mini-submarines pose a significant threat in the Strait of Hormuz. Stealthy and armed with powerful torpedoes and cruise missiles, they keep US warships at bay. Iran's cost-effective strategy challenges advanced US technology.
Web Summary : ईरान की घादिर-श्रेणी की मिनी पनडुब्बियां होर्मुज जलडमरूमध्य में एक महत्वपूर्ण खतरा पैदा करती हैं। शक्तिशाली टारपीडो और क्रूज मिसाइलों से लैस, वे अमेरिकी युद्धपोतों को दूर रखती हैं। ईरान की लागत प्रभावी रणनीति उन्नत अमेरिकी प्रौद्योगिकी को चुनौती देती है।