शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इराणला आणखी एक धक्का! गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब हवाई हल्ल्यात ठार, इस्रायलने सांगितले मारण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:17 IST

Iran Intelligence Minister killed: इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब हवाई हल्ल्यात मारले गेल्यानेच राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी सांगितले. इस्रायलने राजधानी तेहरानमध्येच त्यांना संपवले. 

अली लारीजानी, अजीज नासिरसजादेह यांच्याबरोबर इस्रायलनेइराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब यांनाही एक हवाई हल्ला करत मारले. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. अली लारीजानी, अजीज नासिरजादेह आणि इस्माइल खातिब यांच्या हत्या भेकड कृत्य असल्याचे पेझेश्कियान यांनी म्हटले आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे की, 'माझे प्रिय सहकारी इस्माइल खातिब, अली लारीजानी आणि अजीज नासिरजादेह यांची भेकडपणे केलेली हत्या, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर लोकांच्या मृत्यूमुळे आम्ही शोकसागरात बुडालो आहोत.'

इराणच्या संरक्षण अधिकारी लारीजानी आणि संरक्षण मंत्री नासिरजादेह यांच्या मृत्यूबद्दल आधीच माहिती दिली गेली होती. 

खातिब यांची इस्रायलने हत्या का केली?

इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसने इस्माइल खातिब यांना मारल्याची माहिती बुधवारी (१८ मार्च) दिली होती. आयडीएफने सांगितले की, हा हल्ला तेहरानमधील निश्चित लक्ष्यावर केला गेला होता. याबद्दलची माहिती इस्रायलच्या मंत्र्यांनी आधीच दिली होती. 

इस्रायलच्या आयडीएफने म्हटले आहे की, खातिब यांच्या गुप्तचर मंत्रालयाची दमनकारी आणि दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देण्यास महत्त्वाची भूमिका बजावत होता. स्वतः खातिब यांनी अलिकडेच झालेल्या आंदोलनावर केलेल्या कारवाईत आंदोलकांना अटक आणि हत्या करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 

'खातिब यांना संपवणे, हे इराणी सरकारमधील अनेक वरिष्ठ कमांडर्संना संपवण्याच्या योजनेचाच एक भाग होता. यामुळे सरकारच्या नेतृत्व आणि नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे', असेही इस्रायलने म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Intel Minister Killed in Airstrike; Israel Claims Responsibility

Web Summary : Iran's intelligence minister, Ismail Khatib, was killed in an airstrike, along with others. Israel's IDF claimed responsibility, citing Khatib's role in supporting terrorism and suppressing dissent. This action is part of a larger plan to weaken Iran's leadership.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIsraelइस्रायलIranइराणWarयुद्ध