शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आधी मोठी घोषणा, आता अमेरिकेचा यू-टर्न; स्ट्रेट ऑफ होर्मुझवर तेलवाहू जहाजांची सुरक्षा धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:33 IST

Iran Crisis: तेलवाहून जहाजांना US नौदलाने सुरक्षा दिल्याचा दावा अमेरिकेने केला.

Iran Crisis: मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे ऊर्जा मंत्री क्रिस राइट यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली. होर्मुझ सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) जाणाऱ्या एका तेल टँकरला अमेरिकन नौदलाने सुरक्षा दिल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र काही मिनिटांतच हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आणि व्हाईट हाऊसला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले.

सोशल मीडिया पोस्टमुळे बाजारात खळबळ

क्रिस राइट यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पइराणविरोधातील लष्करी कारवाईदरम्यानही जागतिक ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी असा दावा केला की, अमेरिकन नौदलाने एका तेल टँकरला होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित बाहेर पडण्यास मदत केली, जेणेकरून जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा कायम राहील. या दाव्यानंतर तेल बाजारात तात्काळ प्रतिक्रिया उमटली आणि काही वेळातच तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरू झाले. मात्र काही मिनिटांतच ही पोस्ट हटवण्यात आली.

व्हाईट हाऊसने दिले स्पष्टीकरण

या प्रकरणावर व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलीन लेविट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, अमेरिकन नौदलाने सध्या कोणत्याही तेल टँकरला एस्कॉर्ट केलेले नाही. अशी कारवाई हा एक पर्याय असू शकतो, पण सध्या त्यासंबंधी कोणतेही मिशन सुरू नाही.

इराणकडूनही दाव्याचे खंडन

या घटनेवर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नेही प्रतिक्रिया दिली. इराणी अधिकाऱ्यांनी अमेरिकन ऊर्जा मंत्र्यांचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, अमेरिकन नौदलाचे कोणतेही जहाज होर्मुझ सामुद्रधुनीजवळ येण्याचे धाडसही करू शकले नाही. नंतर अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या प्रवक्त्यानेही सांगितले की, ऊर्जा मंत्र्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला विभागातील कर्मचाऱ्यांनी चुकीचे कॅप्शन दिले होते, त्यामुळे तो पोस्ट हटवण्यात आली.

होर्मुझ सामुद्रधुनीचे का महत्वाची

सध्या होर्मुझ सामुद्रधुनीबाबत जागतिक बाजार अत्यंत संवेदनशील स्थितीत आहे. ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल आणि मोठ्या प्रमाणात एलएनजी याच मार्गाने वाहून नेले जाते.

तेल टँकरांवर हल्ले; शिपिंग कंपन्यांची सेवा बंद

यूके मेरीटाइम ट्रेड ऑर्गनायझेशन आणि इतर संस्थांच्या आकडेवारीनुसार, १ ते १० मार्च दरम्यान किमान १० तेल टँकरांवर हल्ले किंवा हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत. या घटनांनंतर अनेक शिपिंग कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गाने वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे या भागात तेलाचा साठा वाढू लागला आहे आणि अनेक तेल उत्पादक देशांना उत्पादन कमी करावे लागत आहे. सौदी अरेबिया, कुवैत, इराक आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे मोठे तेल उत्पादक देश दररोज लाखो बॅरलने उत्पादन घटवत आहेत.

सामुद्रधुनी बंद राहिल्यास मोठा परिणाम

तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक लवकर सुरू झाली नाही, तर जागतिक ऊर्जा बाजारावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. इराणने संकेत दिले आहेत की, युद्ध सुरू असताना फारसच्या आखातातून तेल निर्यात होऊ दिली जाणार नाही. युद्धापूर्वी दररोज सरासरी सुमारे १३८ जहाजे या मार्गातून जात होती. मात्र सध्या हा आकडा जवळपास शून्यावर आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : US U-Turn on Hormuz Strait Security: Oil Tankers at Risk?

Web Summary : A US official's false claim of naval protection for oil tankers in the Strait of Hormuz sparked market volatility. White House clarified no escort occurred. Increased attacks are disrupting oil supply routes, potentially impacting global energy markets as shipments decline.
टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणCrude Oilखनिज तेलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प