शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:20 IST

न्यायालयीन व्यवस्थेवर सत्ताधारी सरकारचा दबाव वाढत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु

Iran Court, Death sentence, basij militia member murder: इराणच्या न्यायालयाने एका आंदोलनात बसीज मिलिशिया सदस्याच्या हत्येप्रकरणी सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावली. २०२२ साली हे आंदोलन करण्यात आले होते. या आरोपींविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसल्याने या आरोपांबाबत साशंकता आहे. पण तसे असले तरीही त्या आरोपींवर हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. या आरोपींमध्ये मिलाद अरमून, अलिरेझा काफई, अमीर मोहम्मद खोश अग्बाल, नजरान, होसेन नेमती आणि अलिरेझा बरमार्झपौर्नाक यांचा समावेश आहे. या सर्वांना किसास अल-नफस (इस्लामिक प्रतिशोधात्मक मृत्यूदंड) अंतर्गत शिक्षा देण्यात आली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींना या निर्णयाला आव्हान देता येणार आहे. या सहा आरोपींवर बसीज मिलिशिया सदस्य अरमान अलीवर्दी यांच्या हत्येचा आरोप आहे.

आरोपींवर नेमके आरोप काय?

आरोपींवर खून, सार्वजनिक शांतता बिघडवणे असे अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तथापि, या प्रकरणात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अलीवर्दी रक्तबंबाळ पडलेला दिसत होता आणि एक आंदोलक त्याला लाथा मारत होता. आंदोलकांनी अलीवर्दी यांना भोसकल्याचे सरकारी अधिकारी सांगतात, पण आरोपींनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. एखबतानमध्ये राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की अलीवर्दी आंदोलनात घुसण्याचा प्रयत्न करत होते.

न्यायालयीन व्यवस्थेवर सरकारचा दबाव?

इराणमधील न्यायालयीन व्यवस्थेवर सत्ताधारी सरकारचा दबाव वाढत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. विरोधी पक्षांचा आणि आंदोलकांना आवाज दडपण्याचे काम सरकारी यंत्रणा करत असल्याचेही आरोप केले जात आहेत. दरम्यान, या आरोपींचा छळ करण्यात आला असून त्यांच्याविरुद्धच्या खटल्यात निष्पक्षतेचा अभाव असल्याचा मुद्दा मानवाधिकार संघटनांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :IranइराणCourtन्यायालयDeathमृत्यूGovernmentसरकारagitationआंदोलन