शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इराण संघर्ष : ट्रम्प यांची दोन आठवड्यांतच राजकीय कोंडी; सैनिकांचे मृत्यू, तेलदरवाढ व बाजारातील घसरणीमुळे अस्वस्थ जनतेकडून तीव्र टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:34 IST

होर्मुजमध्ये सुरक्षिततेसाठी मदतीचे आवाहन : ट्रम्प यांनी मित्रदेशांना होर्मुज सामुद्रधुनीत जहाजे पाठवण्याचे आवाहन केले. इराणने आखाती देशांच्या उर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू ठेवण्याचा इशारा दिल्याने जागतिक उर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे.

अमेरिका व इस्रायलनेइराणवर हल्ले सुरू केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जनतेकडून राजकीय दबाव वाढताना दिसत आहे. युद्धात अमेरिकेच्या काही सैनिकांचे झालेले मृत्यू, जागतिक तेलदरातील वाढ आणि आर्थिक बाजारातील घसरण यामुळे अमेरिकेच्या जनतेत अस्वस्थता वाढली असून, ट्रम्प प्रशासनावर टीका होत आहे. युद्ध सुरू करण्याचे कारण आणि ते कसे संपवणार याबाबत ठोस स्पष्टीकरण देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीकाही होत आहे. काही ट्रम्प समर्थकांनीही धोरणावर प्रश्न उपस्थित केले असून, ट्रम्प यांच्या लोकप्रियतेच्या आकडेवारीत घट होत असल्याचे संकेत आहेत. नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेच्या सर्वसामान्य जनतेमध्ये महागाईमुळे सरकारविरोधात रोष निर्माण झाला आहे.

ट्रम्प यांच्यावर दबावाची कारणेहोर्मुजमध्ये सुरक्षिततेसाठी मदतीचे आवाहन : ट्रम्प यांनी मित्रदेशांना होर्मुज सामुद्रधुनीत जहाजे पाठवण्याचे आवाहन केले. इराणने आखाती देशांच्या उर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू ठेवण्याचा इशारा दिल्याने जागतिक उर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे.

रशियाच्या तेलावर निर्बंध सैल : अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने पर्शियाच्या आखातात व अन्य भागात अडकलेल्या रशियाच्या तेलवाहू जहाजांना मोकळीक देत ३० दिवसांची सूट दिली. त्यामुळे रशियाचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता असल्याची टीका होत आहे.

ट्रम्प समर्थकांमध्येही मतभेद : “मेक अमेरिका ग्रेट अगेन” (मागा) गटातही इराण युद्धावर मतभेद दिसत आहेत. काहींनी कारवाईला पाठिंबा दिला असला तरी इतरांनी ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात युद्ध समाप्त करण्याचे आश्वासन दिल्याची आठवण करून दिली. इंधन दर वाढत राहिल्यास अमेरिकेत नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाला मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांनी दिला आहे. 

दिवसभरात घडले काय?बहरिनमध्ये हेरगिरीच्या संशयावरून ५ जण अटकेत  बहरिन पोलिसांनी इराणसाठी संवेदनशील माहिती गोळा करणाऱ्या पाच जणांना अटक केली. यातील एकाने इराणमधून विशेष प्रशिक्षण घेतल्याचा आरोप आहे. या गटाने बहरिनमधील महत्त्वाच्या ठिकाणांचे व हॉटेल्सचे फोटो व स्थान निर्देशांक पाठवून लक्ष्य निश्चित करण्यात मदत केल्याचा आरोप आहे.

यूएईने चार क्षेपणास्त्रे आणि सहा ड्रोन पाडले : यूएईने इराणकडून डागण्यात आलेली चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि सहा ड्रोन हवेतच पाडल्याची माहिती दिली. यूएईने आतापर्यंत २९८ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, १५ क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १,६०६ ड्रोन रोखले आहेत. या काळात यूएईमध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून १४२ जण जखमी झाले आहेत.

इस्रायलकडून आपत्कालीन लष्करी निधी मंजूर : इस्रायल सरकारने इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ८२७ दशलक्ष डॉलरचा आपत्कालीन लष्करी निधी मंजूर केला. इस्रायली वृत्तपत्र हारेत्झनुसार हा २.६ अब्ज शेकेलचा निधी दारुगोळा, प्रगत शस्त्र प्रणाली खरेदी आणि युद्धसाठा भरून काढण्यासाठी वापरला जाणार आहे.

नेतान्याहू यांचा व्हिडीओ;  'आय एम डेड फॉर कॉफी!' इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, अशा वावड्या सोशल मीडियावर उठल्या होत्या. मात्र, या सर्व अफवांना नेतन्याहू यांनी रविवारी एका कॉफी शॉपमधून व्हिडीओ शेअर करत हिब्रूमध्ये अतिशय मिश्किलपणे उत्तर दिले आहे. "माझ्या मृत्यूच्या अफवा पसरवणाऱ्यांना मी आता 'कॉफी'च्या माध्यमातून उत्तर देत आहे," असे म्हणत त्यांनी आपण सुखरूप असल्याचे दाखवून दिले.

त्यांच्या मृत्यूच्या अफवांना उत्तर देण्यासाठी नेतन्याहू एका कॅफेमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी कॉफीची ऑर्डर देताना 'एक्स'वर व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुद्दाम आपले दोन्ही हात कॅमेरासमोर धरले आणि आपल्याला १० बोटेच असल्याचे दाखवून दिले. याद्वारे त्यांनी 'सहा बोटे' व 'एआय व्हिडीओ'चे दावे फोल ठरवले.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Conflict: Trump Faces Political Pressure Amidst Casualties, Oil Price Surge

Web Summary : Trump faces rising political pressure after US-Israel strikes on Iran. Casualties, oil price hikes, and market declines fuel public unrest. Critics question the war's purpose and exit strategy, impacting Trump's approval ratings ahead of midterm elections.
टॅग्स :IranइराणWarयुद्धIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू