तेहरान - इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमानं पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. इराण आजही अणुबॉम्ब बनवू शकतो असा खुलासा संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रोसी यांनी केला आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमचा बराचसा भाग इस्फहान परिसरातील एका भूमिगत बोगद्यात साठवला गेला होता आणि तो साठा अजूनही तिथे असण्याची शक्यता आहे असा दावा ग्रोसी यांनी केला आहे.
१० अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता
IAEA नुसार, मागील वर्षी युद्ध सुरू होण्यापूर्वी इराणजवळ जवळपास ४४० किलोहून जास्त ६० टक्के समृद्ध युरेनियम साठा होता. युरेनियमची ही पातळी जर अधिक शुद्ध केली तर सुमारे १० अणुबॉम्ब तयार होऊ शकतात. इस्फहानमध्ये अखेर निरीक्षणावेळी २०० किलो ६० टक्के शुद्धतेचे युरेनियम त्यांच्याकडे होते असं त्यांनी सांगितले. इराणमध्ये तीन प्रमुख अणु केंद्रे आहेत. त्यात इस्फहान, नॅटान्झ आणि फोर्डो इंधन समृद्धी प्रकल्प आहे. मागील वर्षी अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र ठिकाणी मोठे हल्ले केले होते. त्यावेळी अमेरिकेने Northrop Grumman B‑2 Spirit बॉम्बवर्षाव केला होता. हे बॉम्ब जमिनीच्या शेकडो फूट खाली विध्वंस करण्यासाठी सक्षम होते. परंतु इस्फहान येथे उपलब्ध टनल कॉम्प्लेक्स या हल्ल्यात पूर्णत: नष्ट झाले नाहीत.
तसेच सॅटेलाइट फोटो आणि इतर सोर्सेसकडून आतापर्यंत इस्फहानहून अणु साहित्य दुसरीकडे नेल्याबाबत कुठलेही सुगावे नाहीत. काही समृद्ध युरेनियम नतांज केंद्रातही असू शकतात असंही IAEA प्रमुख ग्रोसी यांनी दावा केला आहे. मागील वर्षी हल्ल्यानंतर इराणने IAEA ला अणु भांडाराविषयी पूर्ण माहिती दिली नाही. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनीही बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली नव्हती.
२०२५ मध्ये काय झाले होते?
मागील वर्षी अमेरिकाइस्रायलने इराणच्या अणु भांडारावर मोठे हल्ले केले होते. १३ जून २०२५ रोजी इस्रायलने इराणवर हवाई हल्ले सुरू केले. इस्रायलने ३ प्रमुख अणु केंद्रांना टार्गेट केले होते. त्यात इस्रायलने वैज्ञानिक आणि सैन्य कमांडर यांचा जीव गेला. २२ जून २०२५ रोजी अमेरिकेनेही थेट हस्तक्षेप करत इराणवर ३ हल्ले केले. या हल्ल्यात इराणमधील अणुकेंद्रे नष्ट केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र काही सीक्रेट अहवालानुसार या हल्ल्यात मोठे नुकसान झाले परंतु इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे नष्ट झाला नाही.
Web Summary : IAEA chief claims Iran can still build nuclear bombs, storing enriched uranium in underground facilities. They possess enough enriched uranium for potentially ten bombs, despite past attacks. Inspections have been limited, raising concerns about Iran's nuclear program transparency.
Web Summary : IAEA प्रमुख का दावा है कि ईरान अभी भी परमाणु बम बना सकता है, समृद्ध यूरेनियम भूमिगत सुविधाओं में संग्रहीत है। उनके पास संभावित रूप से दस बमों के लिए पर्याप्त समृद्ध यूरेनियम है, फिर भी पिछले हमलों के बावजूद। निरीक्षण सीमित रहे हैं, जिससे ईरान के परमाणु कार्यक्रम की पारदर्शिता के बारे में चिंता बढ़ रही है।