Iran America War : मध्य पूर्वेत मागील १५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या दरम्यान, आता उत्तर कोरिया देखील युद्धाची तयारी करत असल्याचे दिसून येते. शनिवारी, उत्तर कोरियाने त्याच्या पूर्व किनाऱ्यावरून समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने आणि जपान सरकारने १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याची पुष्टी केली. उत्तर कोरियाने यापूर्वी २७ जानेवारी रोजी पूर्व समुद्राच्या दिशेने अनेक कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा डागली होती.
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की त्यांना दुपारी १:२० वाजता उत्तर कोरियाच्या सुनान भागातून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र आढळले. या वर्षी उत्तर कोरियाने सोडलेले हे तिसरे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र होते.
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की, त्यांना दुपारी १.२० वाजता उत्तर कोरियाच्या सुनान भागातून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र आढळले. या वर्षी उत्तर कोरियाने सोडलेले हे तिसरे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र होते.
दक्षिण कोरिया सतर्क
जेसीएसने म्हटले आहे की, "आमचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे आणि उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांशी संबंधित माहिती अमेरिका आणि जपानसोबत शेअर करत आहे. आम्ही कोणत्याही अतिरिक्त क्षेपणास्त्रांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
जपान सरकारही सतर्क
जपान सरकार या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने डागलेली वस्तू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असू शकते. उत्तर कोरियाने डागलेली संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आधीच समुद्रात पडली आहेत, जपानी तटरक्षक दलाने सांगितले आहे.
दक्षिण कोरिया आणि अमेरिका त्यांचा वार्षिक वसंत ऋतूतील लष्करी सराव 'फ्रीडम शील्ड' आयोजित करत आहेत. या दरम्यान उत्तर कोरियाने ही चाचणी केली आहे.
उत्तर कोरिया अनेकदा या लष्करी सरावांना विरोध करत आला आहे. त्यांना युद्धाची तयारी मानत आला आहे. त्यामुळे, अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सरावांना प्रत्युत्तर म्हणून क्षेपणास्त्र प्रक्षेपण हे त्यांचे लष्करी सामर्थ्य दाखविण्याचा प्रयत्न असू शकतो.
Web Summary : Amidst Iran-Israel conflict, North Korea launched ten ballistic missiles, escalating global tensions. South Korea and Japan confirmed the launches. This action follows previous tests and coincides with US-South Korea military drills, which North Korea perceives as war preparations, signaling a show of force.
Web Summary : ईरान-इज़राइल संघर्ष के बीच, उत्तर कोरिया ने दस बैलिस्टिक मिसाइलें लॉन्च कीं, जिससे वैश्विक तनाव बढ़ गया। दक्षिण कोरिया और जापान ने लॉन्च की पुष्टि की। यह कार्रवाई पिछले परीक्षणों के बाद हुई है और अमेरिका-दक्षिण कोरिया के सैन्य अभ्यास के साथ मेल खाती है, जिसे उत्तर कोरिया युद्ध की तैयारी मानता है, जो शक्ति प्रदर्शन का संकेत है।