अमेरिकाइस्रायलने मागील शनिवारी संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर संतापलेल्या इराणने इस्रायलसह मध्य पूर्वेतील आखाती देशांमधील अमेरिकन सैन्य तळांना टार्गेट केले. इराणने अनेक महत्त्वपूर्ण सैन्य तळांवर अचूक हल्ले केले. त्यात अमेरिकन रडार सिस्टमला मोठे नुकसान झाले. आता जॉर्डनमधील मुवाफ्फाक साल्टी एअर बेसवर तैनात अमेरिकन थार मिसाइल बॅटरी रडार पूर्णपणे इराणी हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहे. त्याशिवाय यूएई आणि सौदी अरेबियातील सैन्य ठिकाणी लावण्यात आलेल्या रडार इमारतीलाही टार्गेट करण्यात आले आहे.
अमेरिका इस्रायलसोबत युद्धात इराणने मिसाइल आणि ड्रोनचा शोध घेणाऱ्या आधुनिक रडारला नष्ट करून एअर डिफेन्स सिस्टम मोडून टाकण्याचे धोरण आहे. आतापर्यंत सर्वात विनाशकारी हल्ला जॉर्डनच्या मुवफ्फक साल्टी हवाई तळावर झाला. जो इराणपासून सुमारे ५०० मैल अंतरावर आहे आणि अमेरिकेचे एक प्रमुख केंद्र आहे. लढाई सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या फोटोत रनवेवर ५० हून अधिक लढाऊ विमाने, ड्रोन आणि ट्रान्सपोर्ट विमाने इथं उभी होती. परंतु आता सॅटेलाइट इमेजने रडारजवळ १३ फुटाचे २ मोठे खड्डे दिसून येत आहेत. ज्यातून हे रडार नष्ट करण्याचा इराणने प्रयत्न केल्याचे कळते.
नष्ट झालेल्या थार क्षेपणास्त्रांसाठी रडार सिस्टम AN/TPY-2 पोर्टेबल रडार होते, जे रेथिऑन कंपनीने बनवले होते. त्याची किंमत अंदाजे अर्धा अब्ज डॉलर्स (५० कोटी) होती. रडार सिस्टम ४० फूट लांबीच्या ट्रेलरमध्ये पसरलेली होती, जी आता पूर्णपणे खराब झाली आहेत किंवा मलब्यात रुपांतरित झाली आहेत. हे रडार आणि थार बॅटरी फेब्रुवारीमध्ये तैनात करण्यात आली होती आणि या रडारवर १ किंवा २ मार्च रोजी हल्ला झाला होता असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हे हल्ले केवळ जॉर्डनपुरते मर्यादित नाहीत. १ मार्च रोजी घेतलेल्या सॅटेलाइट इमेजमध्ये सौदी अरेबियाच्या प्रिन्स सुलतान हवाई तळाजवळील रडार साइटवरून धूर निघत असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, एएन-टीपीवाय/२ रडार हे थार बॅटरीचे हार्ट असते. ते रडार इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यास आणि हवाई धोक्यांचे स्पष्ट चित्र प्रदान करण्यास मदत करते. एका रडारचे नुकसान होणे ही एक महत्त्वाची ऑपरेशनल घटना आहे, कारण ती सहजपणे बदलता येत नाही. इतर ठिकाणाहून बदली युनिट मिळविण्यासाठी बराच वेळ आणि मेहनत घ्यावी लागेल. रडारशिवाय ही प्रणाली पूर्णपणे निरुपयोगी नसली तरी मोठ्या क्षेत्राचे संरक्षण आणि संरक्षण करण्याची त्याची क्षमता गंभीरपणे कमी होते असं शस्त्रास्त्र तज्ञ एन.आर. जेन्झेन-जोन्स यांनी सांगितले.
अर्ली वॉर्निंग रडार सिस्टमचेही नुकसान
जॉर्डनमधील THAAR रडार सिस्टमच नव्हे तर कतारच्या उम्म दहाल येथील अमेरिकन उत्पादित अर्ली वॉर्निंग रडार सिस्टमचेही नुकसान झाल्याची बातमी आहे. इराण जाणुनबुजून रडार आणि गुप्त उपकरणांना टार्गेट करत असल्याचे बोलले जाते. जेणेकरून अमेरिकन ठिकाणांचा बाहेरील जगताशी संपर्क तुटेल. मध्य पूर्वेतील हे रडार अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी संरक्षणाची पहिली पायरी होती तीच आता धोक्यात आली आहे.
Web Summary : Iran targeted US military bases after an alleged Israeli-US strike. Key radar systems in Jordan, UAE and Saudi Arabia were hit. A US radar system worth $500 million in Jordan was destroyed, crippling air defense capabilities.
Web Summary : कथित इजरायली-अमेरिकी हमले के बाद ईरान ने अमेरिकी सैन्य ठिकानों को निशाना बनाया। जॉर्डन, यूएई और सऊदी अरब में महत्वपूर्ण रडार सिस्टम हिट हुए। जॉर्डन में 500 मिलियन डॉलर का अमेरिकी रडार सिस्टम नष्ट हो गया, जिससे वायु रक्षा क्षमताएं कमजोर हो गईं।