विजय मल्ल्यांना मेलबर्नमधील F1 रेससाठी निमंत्रण
By Admin | Updated: March 14, 2016 17:43 IST2016-03-14T17:43:47+5:302016-03-14T17:43:47+5:30
बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळून गेल्याचा आरोप असलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना एफ१ रेससाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे

विजय मल्ल्यांना मेलबर्नमधील F1 रेससाठी निमंत्रण
>ऑनलाइन लोकमत -
मेलबर्न, दि. १४ - बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळून गेल्याचा आरोप असलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना एफ१ रेससाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मेलबर्नमध्ये या आठवड्यात होणा-या एफ१ रेससाठी त्यांना निमंत्रण पाठवलं आहे. रेड कार्पेट घालून विजय मल्ल्या यांचं स्वागत केलं जाणार आहे.
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार ग्रँड पिक्सने विजय मल्ल्या यांना निंमंत्रण पाठवले असून त्याच्या अधिकृत वेबसाईटवरील पाहुण्यांच्या यादीत त्यांचं नावदेखील आहे. गुरुवारी रात्री गव्हर्नमेंट हाऊसमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी अनेक व्हीआयपी उपस्थित असणार आहेत. एकीकडे बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवले असल्याने वादात असलेल्या मल्ल्यांना आमंत्रण दिल्याची अधिकृत माहिती सरकारने दिली आहे. विजय मल्ल्यांच नाव पाहुण्यांच्या यादीतून काढण्यास तुर्तास तरी नकार दिला असल्याची माहिती आहे.