शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इंटरपोलचे प्रमुख रहस्यमयरीत्या बेपत्ता, चीनच्या ताब्यात असल्याची शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 10:53 IST

जागतिक पोलीस यंत्रणा म्हणून ओखळ असलेल्या इंटरपोलचे प्रमुख मेंग होंगवेई हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहेत. फ्रान्स पोलिसांना त्यांच्या शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. 

पॅरिस - जागतिक पोलीस यंत्रणा म्हणून ओखळ असलेल्या इंटरपोलचे प्रमुख मेंग होंगवेई हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहेत. फ्रान्सपोलिसांना त्यांच्या शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. मेंग होंगवेई हे फ्रानमधून आपला मूळ देशी चीनला रवाना झाले होते. मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. 29 सप्टेंबरला फ्रान्स येथून रवाना झाल्यापासून मेंग यांच्या पत्नीचा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.  त्यानंतर मेंग यांच्या पत्नीने फ्रान्समधील लिओन येथील पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, मेंग यांच्या बेपत्ता होण्याचा तपास करत असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये मेंग यांचे चीनमधील अधिकाऱ्यांसोबत काही मतभेद झाल्याचे तसेच त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असावे, असे वाटते." हल्लीच्या वर्षांमध्ये चिनी अधिकारी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे प्रकार घडल्यानंतर बऱ्याच काळाने त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती चिनी सरकार देते. 64 वर्षीय मेंग यांना चीनमध्ये दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असे वृत्त हाँगकाँगमधील साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने गोपनीय सूत्राच्या हवाल्याने दिले आहे. मात्र मेंग यांना कोणत्या कारणासाठी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले हे या सूत्रांनी सांगितलेले नाही. दरम्यान, इंटरपोलच्या प्रमुखांचे बेपत्ता होणे हे चिंताजनक आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी पोलीस संस्था असून, 192 देश या संस्थेचे सदस्य आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसchinaचीनFranceफ्रान्स