शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनचा मोठा विजय! तातडीनं युद्ध रोखण्याचे रशियाला दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 22:26 IST

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धावर बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निकाल देताना दोन्ही बाजूंनी हे युद्ध त्वरित थांबवावे, असे म्हटले आहे.

कीव्ह-

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धावर बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निकाल देताना दोन्ही बाजूंनी हे युद्ध त्वरित थांबवावे, असे म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनने हा वाद आता वाढवू नये, असे आयसीजेने आपल्या आदेशात नमूद केलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय युक्रेनमध्ये रशियाच्या बळाचा वापर करत असल्याबद्दल अत्यंत चिंतित आहे, असं या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी म्हटलं आहे. आता रशिया आयसीजेच्या आदेशाचे पालन करतो की नाही हे पाहावं लागेल.

"रशियानं युक्रेनमध्ये बळाचा वापर केल्यानं आम्ही खूप चिंतीत आहोत. यातून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या गंभीर समस्यांना जन्म दिला गेला आहे", असं आयसीजेनं म्हटलं. "न्यायालयाला युक्रेनमध्ये घडणाऱ्या मानवी शोकांतिकेची पूर्ण कल्पना आहे. न्यायालयाने रशिया आणि युक्रेनला सध्याच्या वादाचा पाठपुरावा न करण्याचे आदेश दिले आहेत. रशियाच्या बाजूने कोणत्याही पक्षाने यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालय कोणताही निर्णय घेईल, तो सर्वांवर बंधनकारक असेल, असं न्यायाधीश जोन डोनोघ्यू यांनी न्यायालयाचा निर्णय वाचून दाखवताना म्हटलं. 

आम्ही जिंकलो- जेलेन्स्की"युक्रेनने रशियाविरुद्धचा खटला आयसीजेमध्ये जिंकला आहे. आयसीजेने हा हल्ला तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बंधनकारक आहे. रशियाने त्वरित त्याचे पालन केले पाहिजे. न्यायालयाचा आदेश न पाळल्यास रशिया आणखी एकटा पडेल", असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वेलोदिमीर जेलेन्स्की म्हणाले. 

रशियाने निर्णय स्वीकारला नाही तर काय होईल? जर एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला, तर ICJ न्यायाधीश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे कारवाईची मागणी करू शकतात, जेथे रशियाला व्हेटो पॉवर आहे. युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांना रशियाला तात्काळ लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याचे आवाहन केले. यापूर्वी 7 मार्च रोजी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली होती. रशियाने सुनावणीवर बहिष्कार टाकला होता.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीयrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन