गुप्तचर, लष्करी कर्मचाऱ्यांची माहिती हॅक
By Admin | Updated: June 14, 2015 02:22 IST2015-06-14T02:22:08+5:302015-06-14T02:22:08+5:30
चीनशी संबंधित हॅकर्सनी अमेरिकी गुप्तचर संघटना व लष्कराशी संबंधित १.४ कोटी लोकांची संवेदनशील माहिती हॅक केल्याचा संशय अमेरिकी अधिकाऱ्यांना आहे.

गुप्तचर, लष्करी कर्मचाऱ्यांची माहिती हॅक
वॉशिंग्टन : चीनशी संबंधित हॅकर्सनी अमेरिकी गुप्तचर संघटना व लष्कराशी संबंधित १.४ कोटी लोकांची संवेदनशील माहिती हॅक केल्याचा संशय अमेरिकी अधिकाऱ्यांना आहे.
एका मोठ्या हॅकिंगची माहिती गेल्या आठवड्यातच समोर आली होती; मात्र अधिकाऱ्यांनी आता एका दुसऱ्या कथित हॅकिंगशी संबंधित माहिती दिली आहे. या हॅकिंगनंतर अमेरिकेचे सुरक्षा अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना ब्लॅकमेल केले जाईल, अशी भीती आहे. हॅक झालेली माहिती आॅफिस आॅफ पर्सनल मॅनेजमेंटची आहे. (वृत्तसंस्था)