‘इंटेल’ करणार मनुष्यबळ कपात
By Admin | Updated: April 17, 2016 03:16 IST2016-04-17T03:16:56+5:302016-04-17T03:16:56+5:30
प्रसिद्ध संगणक उत्पादक कंपनी ‘इंटेल’ आपल्या काही व्यावसायिक प्रतिष्ठानांतील मनुष्यबळ कमी करण्याची शक्यता आहे. या कपातीची टक्केवारी दोन आकडी असेल, असे वृत्त ओरेगॉन

‘इंटेल’ करणार मनुष्यबळ कपात
वॉशिंग्टन : प्रसिद्ध संगणक उत्पादक कंपनी ‘इंटेल’ आपल्या काही व्यावसायिक प्रतिष्ठानांतील मनुष्यबळ कमी करण्याची शक्यता आहे. या कपातीची टक्केवारी दोन आकडी असेल, असे वृत्त ओरेगॉन लाईव्ह या वेबसाईटने दिले आहे.
अमेरिकेत गेल्या वर्षी अकराशेहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. इंटेलमधील या वर्षीची मनुष्यबळ कपात त्याहून अधिक असेल, असे या वृत्तात म्हटले असून हे वृत्त कंपनीशी निकटचे संबंध असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले आहे. कंपनी येत्या मंगळवारी पहिल्या तिमाहीतील वित्तीय परिणाम जाहीर करणार असून त्यानंतर लगेचच मनुष्यबळ कपात केली जाणार आहे. (वृत्तसंस्था)