शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

भयावह! इन्शुरन्स कंपनीच्या सीईओला तरुणाने संपविले; लोक आनंदात, आरोपीला म्हणतायत हिरो; ही परिस्थिती कशामुळे आली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:28 IST

United Healthcare CEO Murder: अमेरिकेत यूनाइडटेड हेल्थकेयरच्या सीईओची हत्या, हत्येनंतर लोक हल्लेखोराला वाचविण्यासाठी पैसे गोळा करत आहेत, का?

अमेरिकेतील अब्जाधीश असलेले व एका मोठ्या होल्थकेअर कंपनीचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एका अब्जाधीशाची हत्या झाली तरी अमेरिकन नागरिकांत त्या अब्जाधीशाबाबत दु:ख, आक्रोश नाही तर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. हा भयावह प्रकार इन्शुरन्स कंपन्यांना त्यांचे वागणे सुधारण्यासाठी धोक्याची घंटा वाजविणारा आहे. 

थॉम्पसन यांची हत्या करणारा आरोपी हा २६ वर्षांचा आहे. लुईगी मैंगियोन असे त्याचे नाव असून अमेरिकी जनता त्याला हिरो मानू लागली आहे. त्याची केस लढण्यासाठी लाखोंच्या पटीत फंड उभा केला जात आहे. त्याला सोडविण्यासाठी ऑनलाईन मोहिमा सुरु केल्या जात आहेत. मोठ्या संख्येने त्याच्या समर्थनार्थ लोक सोशल मीडियावर लिहू लागले आहेत. एखाद्याच्या हत्येनंतर अशी परिस्थिती उभी ठाकणे ही भयावह आहे. रस्त्या रस्त्यावर सीईओचे वॉन्टेड म्हणून फोटो लावले जात आहेत. ही परिस्थिती का आली, यावर आता इन्शुरन्स क्षेत्रातील तज्ञ मत व्यक्त करू लागले आहेत. 

एखादा व्यक्ती अडीनडीच्या काळात, आजारी पडल्यावर किंवा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक मदत मिळावी म्हणून इन्शुरन्स काढतो. परंतू, कंपन्या काही ना काही कारण सांगून त्या इन्शुरन्स धारकाला किंवा त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स देणे टाळतात. या कंपन्यांना त्या इन्शुरन्स धारकाला मदत करण्याऐवजी आपल्या नफ्याची चिंता लागून राहिलेली असते. यामुळे इन्शुरन्स कंपन्यांविरोधात भारतातच नाही तर अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांत संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. 

हे लोक इन्शुरन्स कंपन्यांच्या कार्यप्रणालीमुळे त्रस्त झालेले आहेत. क्लेम रिजेक्शनच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये रोष आहे. यूनाइडटेड हेल्थकेयरच्या सीईओची हत्या का करण्यात आली याचे कारण समोर आलेले नसले तरी लोकांमधील बाहेर येत असलेली संतापाची भावना, एखाद्याच्या मृत्यूवर जसे की तो मोठा अपराधी, नराधम आहे त्यालाच संपविले, यामुळे सुरु असलेला जल्लोष आदी गोष्टी पाहता या इन्शुरन्स कंपन्यांनी किती लोकांवर अत्याचार केले आहेत याची जाणीव होत आहे. 

इन्शुरन्स कंपन्यांमध्ये क्लेम सेटल करण्यास विलंब, रिजेक्शन आणि तो का रिजेक्ट केला याचा निर्णय घेण्यासाठी बचाव आदी गोष्टींमुळे लोक त्रस्त आहेत. पोलिसांना घटनास्थळावर ज्या बंदुकीच्या गोळ्या मिळाल्या, त्यावर डिले, डिनाय आणि पॉसिबली डिपोज असे लिहिलेले होते. कंपन्या ३डी या एकाच तत्वावर काम करतात. यामध्ये क्लेम आला तर तो डिले, डिनाय आणि डिफेंड करायचे धोरण अवलंबिले जाते. हेच या कंपन्य़ांचे धोरण बनले असून सीईओची हत्या यामागचा आक्रोश असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी