शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मुलींऐवजी मुलंच शाळेत घालून गेली शॉर्ट स्कर्ट

By admin | Published: June 23, 2017 3:14 PM

डेवोन शहरातील तीस मुलं चक्क शॉर्ट स्कर्ट घालून शाळेत जाताना दिसली.

ऑनलाइन लोकमत

डेवोन, दि. 23- आपण नेहमीच मुलींना शाळेमध्ये स्कर्ट आणि फ्रॉक घालून जाताना पाहतो. पण इंग्लंडमध्ये विरूद्ध चित्र गुरूवारी सकाळी तेथिल नागरीकांनी बघितलं. तेथे असलेल्या डेवोन शहरातील तीस मुलं चक्क शॉर्ट स्कर्ट घालून शाळेत जाताना दिसली.  शहरात असलेल्या इस्का अकॅडमीमध्ये गुरूवारी सकाळी 30 मुलांनी चक्क शॉर्ट स्कर्ट घालून शाळेत प्रवेश केला. तेथिल वाढत्या कडाक्याच्या उन्हामुळे या विद्यार्थ्यांनी फुल पँटऐवजी हाफ पँट वापरायची परवानगी द्या, अशी मागणी शाळा प्रशासनाकडे केली होती पण शाळेच्या गणवेशाबाबतच्या नियमांमध्ये हाफ पँट वापरायचा नियम नाही, असं सांगत विद्यार्थ्यांची ही मागणी अमान्य करण्यात आली. यानंतर शॉर्ट स्कर्ट असलेला गणवेश मुलींना कसा चालतो, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी केल्यावर तुम्हाला स्कर्ट घालण्यापासून कोणी रोखलं नाही, असं गमतीशीर उत्तर शाळेकडून देण्यात आलं होतं. शाळा प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी या मुलांनी शॉर्ट स्कर्ट घालून शाळेत प्रवेश केला.  द गार्डीयन या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. 
 
डेवोनमध्ये या आठवड्यात 30 अंशाच्या वर तापमानाचा पारा गेला होता. वाढत्या गर्मीमुळे फुल पँट घालून वर्गात बसणं शक्य नसल्याने मुलांनी हाफ पँट वापरण्याची परवानगी मागितली होती.  पण हाफ पँट वापरणं नियमात बसत नाही, असं या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं. शाळेमध्ये स्कर्ट घालून यायची युक्ती आम्हाला मुख्यध्यापकांमुळेच मिळाली, असं त्यांच्यापैकी एका विद्यार्थ्यांने सांगितलं. आमच्या या कृतीमुळे फुल पँटची सक्ती असणारा निर्णय शाळा लवकरच बदलेल तसे संकेत मुख्याध्यापकांनी दिले आहेत, असंही या मुलांनी सांगितलं आहे. 
 
यंदाचं तापमान जास्त आहे याची कल्पना आम्हाला आहे. त्यामुळेच शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आरामात शाळेत बसता येइल या दृष्टीने आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असं शाळेच्या मुख्याध्यापिका अॅमी मिशेल यांनी सांगितलं आहे. तर शाळेच्या निर्णयाविरोधात मुलांनी आवाज उठवला आणि त्यांची बाजू शाळेसमोर ठेवली याचा आम्हाला अभिमान असल्याचं मत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केलं आहे. 
 
भेदभाव केलेला विद्यार्थ्यांनाही आवडत नाही. शाळेतील शिक्षिका सँडल्स आणि स्कर्ट वापरतात पण मुलांना मात्र फुल पँट, शूज आणि ब्लेझर वापरावं लागतं. हे अयोग्य असून मुलं हाफ पँट का वापरू शकत नाही, असं मत एका विद्यार्थ्याच्या पालकाने व्यक्त केलं आहे.