शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्राम स्टार किली पॉलवर चाकुहल्ला, म्हणतो लोग झुकाना चाहते है लेकिन मैं झुकेगा नही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:42 IST

किलीच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. किली पॉल अज्ञात व्यक्तींनी केलेल्या चाकु आणि लाठी हल्ल्यात जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सोशल मीडियावरील टांझानियाचा इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर, किली पॉल (Kili Paul Instagram) जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील विविध भाषांमधील गाण्यांवर रील बनवणाऱ्या (Kili Paul Reels on Bollywood Songs) किलीचे आणि त्याच्या बहिणीचे लाखो फॉलोअर्स आहेत. विशेषत: भारतात या दोघांना विशेष प्रसिद्ध मिळाली आहे. दरम्यान किलीच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. किली पॉल अज्ञात व्यक्तींनी केलेल्या चाकु आणि लाठी हल्ल्यात जखमी झाल्याचे वृत्त आहे.

ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा या सोशल मीडिया सेन्सेशनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. त्याने यामध्ये असे म्हटले आहे की,  या हल्ल्यात (Attack on Kili Paul) तो जखमी झाला असून त्याला पाच टाके देखील पडले आहेत. किलीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो एका बेडवर जखमी अवस्थेत पडलेला दिसत आहे.

ही स्टोरी शेअर करताना त्याने या हल्ल्याची माहिती देणारं एक कॅप्शन शेअर केलं आहे. त्याने असं म्हटलं आहे की, 'माझ्यावर ५ जणांनी हल्ला केला, स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात माझ्या उजव्या हाताला चाकूने दुखापत झाली आणि मला ५ टाके पडले आणि मला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. पण मी देवाचे आभार मानतो की दोघांना मारून स्वतःचा बचाव करू शकलो. ते पळून गेले पण मी आधीच जखमी होतो, माझ्यासाठी प्रार्थना करा.'

भारतीय गाण्यांच्या व्हायरल लिप-सिंकिंग व्हिडीओंमुळे किली वेळोवेळी चर्चेत असतो. त्याने अलीकडेच आलेल्या 'KGF 2' मधील डायलॉग, पुष्पामधील गाणी, भारतात प्रसिद्ध झालेली विविध गाणी, भारतीय इन्स्टा इन्फ्लुएन्सर्सनी पोस्ट केलेली रील्स इ. यावर किलीने रील्स पोस्ट केले आहेत. भारतीय स्टार्सकडूनही अनेकदा त्याची प्रशंसा झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'मन की बात' मध्ये किली पॉल आणि त्याची बहिण नीमा पॉल यांचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले होते. तर त्याआधी काही दिवसापूर्वी टांझानियातील भारतीय उच्चायुक्तालयाने किली पॉल याला सन्मानित केलं होत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल