लष्करी मुख्यालयात घुसून इसिसचा हल्ला
By Admin | Updated: March 2, 2016 02:31 IST2016-03-02T02:31:01+5:302016-03-02T02:31:01+5:30
इस्लामिक स्टेटच्या (आयएस) चार आत्मघाती हल्लेखोरांनी सोमवारी बगदादच्या पश्चिमेकडील लष्कराच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात इराकी जनरलसह पाच जण ठार व सात सैनिक जखमी झाले.

लष्करी मुख्यालयात घुसून इसिसचा हल्ला
बगदाद : इस्लामिक स्टेटच्या (आयएस) चार आत्मघाती हल्लेखोरांनी सोमवारी बगदादच्या पश्चिमेकडील लष्कराच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात इराकी जनरलसह पाच जण ठार व सात सैनिक जखमी झाले.
दहशतवाद्यांनी अनबार प्रांतातील हदिथा भागात असलेल्या रेजिमेंटल मुख्यालयावर हल्ला केला. त्यात स्टाफ ब्रिगेडियर जनरल अली अबौद, लेफ्टनंट कर्नल फरहान इब्राहिम आणि अन्य चार जण ठार झाले. मेजर जनरल व अल- जझिरा आॅपरेशन्स कमांडचे प्रमुख अली इब्राहिम दबौऊन म्हणाले की, एका आत्मघाती हल्लेखोराने अबौद यांच्या कार्यालयात स्वत:ला उडवून घेतले, तर इतर तिघांनी मुख्यालयात अन्य ठिकाणी स्फोट घडविले. (वृत्तसंस्था)