असंवेदनशीलतेची हद्द - दुबईतल्या जळत्या हॉटेलच्या पार्श्वभूमीवर या जोडप्यानं काढला सेल्फी
By Admin | Updated: January 2, 2016 13:56 IST2016-01-02T13:56:54+5:302016-01-02T13:56:54+5:30
दुबईमध्ये एका हॉटेलला आग लागलेली असताना त्या पार्श्वभूमीवर एका जोडप्यानं सेल्फी काढून ती इन्स्टाग्रामवर पोस्ट केली

असंवेदनशीलतेची हद्द - दुबईतल्या जळत्या हॉटेलच्या पार्श्वभूमीवर या जोडप्यानं काढला सेल्फी
>ऑनलाइन लोकमत
अबुधाबी, दि. २ - दुबईमध्ये एका हॉटेलला आग लागलेली असताना त्या पार्श्वभूमीवर एका जोडप्यानं सेल्फी काढून ती इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. या जोडप्याच्या या वादग्रस्त कृतीची ट्विटरवर निर्भत्सना करण्यात आली आहे. या जोडप्यानं हा फोटो सोशल मीडियावर टाकला आणि त्यात भर म्हणजे देव तुमचं रक्षम करो, प्रचंड अशा फटाक्यांच्या आतषबाजीनं तो नेहमीच आश्चर्यचकीत करतो अशी कॅप्शनही दिली.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईमधल्या हॉटेलमध्ये आग लागली. अनेकांनी या आगीचे फोटो व व्हिडीयो अपलोड केले. परंतु या जोडप्याने मात्र शहाणपणा करत या पार्श्वभूमीचा वापर सेल्फीसाठी केला आणि सोशल मीडियावर रोष ओढवून घेतला.
आत्तापर्यंतची सगळ्यात चुकीची सेल्फी, मूर्खपणाचा कळस, २०१६चा पहिला मूर्खपणाचा पुरस्कार या जोडप्यालाच अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लगेचच सोशल मीडियावर या जोडप्याला मिळाल्या.
या आगीमुळे ह्रदयविकाराच्या धक्क्याने एकाचे प्राण गेले, एकजण जबर जखमी झाला तर १६ जणांना किरकोळ दुखापती झाल्या.