इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात, 10 प्रवाशांचा मृत्यू
By Admin | Updated: July 12, 2016 17:09 IST2016-07-12T17:05:22+5:302016-07-12T17:09:04+5:30
इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात झाला असून 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 12 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत

इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात, 10 प्रवाशांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत -
रोम, दि. 12 - इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात झाला असून 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 12 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दोन प्रवासी ट्रेनने एकमेकांना समोरुन धडक दिली असल्याची माहिती मिळत आहे. कोरॅटो आणि अँड्रिया शहरांच्या मध्यभागी अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात इतका भीषण होती की ट्रेनचा चेंदामेंदा झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्याला सुरुवात केली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.