शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वाऱ्यामु‌ळे गरोदर झाल्याचा इंडोनेशियातील महिलेचा दावा, सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:35 IST

Indonesian woman claims to be pregnant due to wind: या महिलेचे नाव सिती झैना (२५) असून, तिने असाही दावा केला आहे की, गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर अवघ्या दोन तासांतच मी बाळाला जन्म दिला.

जकार्ता : वाऱ्याच्या झोताने गरोदर राहिल्याचा विचित्र दावा इंडोनेशियातील एका महिलेने केला आहे. तेथील पोलीस आता या आगळ्यावेगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोशल मीडियावर या घटनेची उदंड चर्चा सुरू आहे.या महिलेचे नाव सिती झैना (२५) असून, तिने असाही दावा केला आहे की, गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर अवघ्या दोन तासांतच मी बाळाला जन्म दिला. इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रांतातल्या सिआंजूर या गावी राहणाऱ्या सिती झैना हिने गेल्या आठवड्यात पत्रकारांकडे असा दावा केला की, गेल्या आठवड्यात मी घरी विश्रांती घेत असताना वाऱ्याचा झोत आला व तो गुप्तांगात शिरला. त्यानंतर १५ मिनिटांनी माझ्या पोटात दुखू लागले व ते आणखी वाढतच गेले. त्यामुळे मी रुग्णालयात धाव घेतली व काही वेळाने एका मुलीला जन्म दिला. सितीने केलेल्या विचित्र दाव्याची कहाणी साऱ्या सिआंजूर गावामध्ये पसरली. समाजमाध्यमांवरही या प्रकाराची उदंड चर्चा सुरू झाली. सितीने स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या गर्भारपणाच्या कारणाबद्दलचा विचित्र दावा केला. (वृत्तसंस्था)

गरोदरपणाची लक्षणे जाणवली नसावीतस्थानिक वैद्यकीय अधिकारी एमान सुलेमान यांनी सांगितले की, सिती व तिला झालेली मुलगी यांची प्रकृती उत्तम आहे. कधी कधी एखाद्या महिलेला ती गरोदर असण्याची प्रारंभिक लक्षणे अजिबात जाणवत नाहीत. त्यामुळे प्रसूती झाल्यानंतर ते सारे काही अचानक घडले असे वाटण्याची शक्यता असते.

टॅग्स :Indonesiaइंडोनेशियाpregnant womanगर्भवती महिलाPregnancyप्रेग्नंसी