शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मास्क न वापरणारे खोदतायत कोरोनामुळे मरणारांसाठी कबर, अनोख्या शिक्षेमुळे 'हा' देश चर्चेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 00:44 IST

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन जणांना एक कबर खोदण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोर्म जिल्हा प्रमुख स्यूनो यांनी सांगितले, आमच्याकडे कबर खोदणाऱ्या लोकांची कमतरता आहे. यामुळेच मास्क न लावणाऱ्यांना या कामासाठी लावले आहे.

जकार्ता - कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक देश मास्कचा वापर करण्याचे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, जवळपास सर्वच देशांत, सरकारच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. हेच लोक सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संक्रमाणाची गती वाढवत आहेत. पण, अशा लोकांचा सामना करण्यासाठी इंडोनेशियातील ईस्ट जावा प्रांताने अनोख्या शिक्षेची घोषणा केली आहे.

मास्क लावले नाही, तर खोदावी लागणार कबर -ईस्ट जावा प्रशासनाने मास्क न लावणाऱ्यांना शिक्षा म्हणून, कोरनामुळे मृत्यू पावणाऱ्यांसाठी कबर खोदण्याचा आदेश दिला आहे. ईस्ट जावातील गेरसिक रिजन्सीच्या आठ लोकांना मास्क लावण्यास नकार दिल्याने, जवळीलच नॉबबेटन गावात एका सार्वजनिक स्मशानभूमीत कबर खोदण्याची शक्षा दिली आहे. हे लोक कुठल्याही रुग्णाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकत नाहीत. 

इंडोनेशियात कबर खोदणारांची कमतरता -माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन जणांना एक कबर खोदण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोर्म जिल्हा प्रमुख स्यूनो यांनी सांगितले, आमच्याकडे कबर खोदणाऱ्या लोकांची कमतरता आहे. यामुळेच मास्क न लावणाऱ्यांना या कामासाठी लावले आहे. अशा शिक्षेमुळे लोक भविष्यात मास्क न लावण्याची चूक करणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सोमवारपासून जकार्तात 14 दिवसांचा लॉकडाउन -इंडोनेशियात आतापर्यंत 218,382 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा 8,723 वर पोहोचला आहे. राजधानी जकार्तात 54,220 लोक कोरोना संक्रमित आहेत. येथे कोरोनाला आळा घालण्यासाठी सोमवारी दोन आठवड्यांकरिता  कोरोनासंदर्भातील बंदी लागू झाली आहे. पोलीस मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहेत. तसेच 27 सप्टेंबरपर्यंत सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांवर बंदी राहील. तर काही महत्वाच्या सेवा 50 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री 

योगी आदित्यनाथांनी आग्र्याच्या मुघल म्यूझियमचं नाव बदललं, आता छत्रपती शिवरायांच्या नावानं ओळखलं जाणार

"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'"

सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

भारत-चीनदरम्यान LACवर युद्धाची तयारी? टँक्स, अधुनिक शस्त्रास्त्रे तैनात

उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न, किम जोंग भडकला; 5 अधिकाऱ्यांना गोळी घालण्याचा दिला आदेश

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndonesiaइंडोनेशियाGovernmentसरकार