शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात जाणार, इम्रान खान सरकारने दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 08:25 IST

गेल्या महिन्यात अफगाणिस्तानसंदर्भात रशियात झालेल्या मॉस्को फॉरमॅटमध्ये भारताने तालिबानी नेत्यांची भेट घेऊन अफगाणिस्तानला तात्काळ मानवतावादी मदत देऊ केली होती.

इस्लामाबाद:पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने भारताचा गहू अफगाणिस्तानात पाठवण्याचे मार्ग खुले केले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्व मंत्रालयांना मदत देण्याचे निर्देश दिले. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानसंदर्भात रशियात झालेल्या मॉस्को फॉरमॅटमध्ये भारताने तालिबानी नेत्यांची भेट घेऊन अफगाणिस्तानला मानवतावादी मदत देऊ केली होती. 

अनेक देशांची अफगाणिस्तानला मदततालिबान राजवट आल्यानंतर अफगाणिस्तानात भारताकडून ही पहिली मदत असेल. यापूर्वी इराण, यूएई आणि पाकिस्तानसारख्या देशांनी अफगाणिस्तानला रसद आणि वैद्यकीय साहित्य पाठवले आहे. नुकत्याच आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, अफगाणिस्तानातील सुमारे 4 कोटी लोकांना अन्न संकटाचा सामना करावा लागू शकतो, तर सुमारे 9 लाख आधीच उपासमारीच्या मार्गावर आहेत.

पाकिस्तान सरकारच्या बैठकीत निर्णयमिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तान इंटर-मिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशन सेल(AICC) च्या बैठकीत अफगाणिस्तानला जास्तीत जास्त सुविधा देण्याचे निर्देश सर्व मंत्रालयांना दिले. त्यांनी 5 अब्ज रुपयांची मानवतावादी मदत तात्काळ पाठवण्याचे आदेश दिले, ज्यात 50,000 मेट्रिक टन गहू, आपत्कालीन वैद्यकीय पुरवठा, हिवाळी निवारा आणि इतर पुरवठा यासह अन्नपदार्थांचा समावेश आहे. या बैठकीला परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी, वित्त सल्लागार शौकत फयाज तारीन, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. मोईद युसूफ आणि वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.

अफगाणिस्तान मदत घेण्यास तयारगेल्या महिन्यात भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी मदत म्हणून 50 हजार मेट्रिक टन गहू वाघा सीमेवरुन पाठवण्याची विनंती भारताने पाकिस्तानला केली होती. त्यानंतर अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर अहमद मुट्टाकी यांनीही गेल्याच आठवड्यात पंतप्रधान इम्रान खान यांना भारताकडून पाकिस्तानमार्गे येणारा गहू येऊ देण्याची विनंती केली. यानंतर अखेर इम्रान खान यांनी पाकिस्तानमार्गे भारतीय गहू जाऊ देण्यास परवानगी दिली आहे.

अफगाणिस्तानात मुले भुकेने मरू शकतातजागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानमध्ये या वर्षाच्या अखेरीस लाखो मुले उपासमारीने मरू शकतात. तालिबान सत्तेनंतर अफगाणिस्तानातील बिघडलेल्या परिस्थितीवर WHO च्या वक्तव्याने पुन्हा जगाचे लक्ष वेधले आहे. हिवाळ्याच्या मोसमात अफगाणिस्तानातील तापमान कमी असेल आणि भुकेने अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागू शकतो. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, WHO ने सांगितले की, वर्षाच्या अखेरीस सुमारे 32 लाख अफगाण मुले तीव्र कुपोषणाला बळी पडतील. यापैकी सुमारे 10 लाख बालकांना मृत्यूच्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तान