शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन वस्तूंवरील आयात करास भारताची पुन्हा स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 05:45 IST

आता २ नोव्हेंबरपर्यंत करांची अंमलबजावणी लांबणीवर

नवी दिल्ली : अमेरिकेच्या २९ वस्तूंवर लादलेल्या वाढीव आयात कराच्या अंमलबजावणीस भारताने दुसऱ्यांदा स्थगिती दिली असून, २ नोव्हेंबरपर्यंत या करांची अंमलबजावणी आता लांबणीवर पडली आहे.अमेरिकेने भारताविरुद्ध लावलेल्या वाढीव आयात कराला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने जूनमध्ये या करांची घोषणा केली होती. ४ आॅगस्टपासून त्यांची अंमलबजावणी होणार होती. तथापि, या करांना ४५ दिवस स्थगिती देऊन अंमलबजावणी १८ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. या करांना आता पुन्हा एकदा स्थगिती देऊन अंमलबजावणी २ नोव्हेंबरपर्यंत लांबविण्यात आली आहे. नव्या निर्णयाशी संबंधित अधिसूचना काल रात्री जारी करण्यात आली.अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९ मार्च रोजी एक निर्णय घेऊन स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमच्या आयातीवर कठोर आयात कर लावले होते. या निर्णयाचा भारताला फटका बसणार असल्यामुळे भारताने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या २९ वस्तूंवर वाढीव आयात कर लावण्याचा निर्णय घेतला होता.सूट मिळवण्यासाठी हालचालीअमेरिकेने लादलेल्या वाढीव आयात करातून भारतीय स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमला सूट मिळावी, यासाठी भारताकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जनरलाइज्ड सिस्टीम आॅफ प्रेफरन्सेस (जीएसपी)अंतर्गत आपल्या वस्तूंना निर्यातीचे लाभ मिळावेत, अशी भारताची मागणी आहे. १९७६ साली करण्यात आलेल्या जीएसपी करारामुळे भारताच्या ३,५00 वस्तूंना करमुक्त अमेरिकी बाजार उपलब्ध झालेला आहे.

टॅग्स :USअमेरिकाIndiaभारत