अमेरिका आणि चीन व्यापार युद्धात भारताचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 18:42 IST2017-01-08T18:42:14+5:302017-01-08T18:42:14+5:30

अमेरिका आणि चीन व्यापार युद्धात भारताचे मोठे नुकसान होऊ शकते, असे मत असोचेमने व्यक्त केले आहे.

India's loss in America and China trade war | अमेरिका आणि चीन व्यापार युद्धात भारताचे नुकसान

अमेरिका आणि चीन व्यापार युद्धात भारताचे नुकसान

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - अमेरिका आणि चीन व्यापार युद्धात भारताचे मोठे नुकसान होऊ शकते, असे मत असोचेमने व्यक्त केले आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि चीनसोबत व्यापार युद्ध छेडल्यास त्याचा भारतावरही परिणाम होऊ शकतो. त्यासाठी भारताला अगोदरच सावध पावले उचलावी लागतील, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.

असोचेमने या अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे काही निवडक वस्तूूंबाबत भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या निशाण्यावर चीन आणि मेक्सिको हे देश आहे. पण भारतालाही सावध राहण्याची गरज आहे. अमेरिकेच्या नव्या प्रशासनासोबत भारताला संबंध वाढवावे लागतील. त्यामुळे अमेरिकेतील नोकऱ्यांबाबतची काळजी दूर होऊ शकेल, असंही मत असोचेमने व्यक्त केले आहे. 

Web Title: India's loss in America and China trade war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.