शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

भारताची डोकेदुखी वाढणार; बांग्लादेशचे चीनला 'चिकन नेक'जवळ गुंतवणूकीचे आमंत्रण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 19:47 IST

'चिकन नेक' हा ईशान्येकडील सात राज्यांना भारताच्या इतर भागांशी जोडणारा भाग आहे. चीनचा अनेक वर्षांपासून यावर डोळा आहे.

Bangladesh-India Relation : बांग्लादेशात सत्तांतर झाल्यापासून भारतासोबतचे संबंध बिघडले आहेत. अशातच, चीन दौऱ्यावरुन परतलेले बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार(प्रमुख) मोहम्मद युनूस यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते चीनलाभारताच्या सीमेजवळ आपली उपस्थिती वाढवण्याचे आमंत्रण देताना दिसतात. या व्हिडिओमध्ये युनूस भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर भाष्य केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोहम्मद युनूस चिनी सरकारला बांग्लादेशमध्ये 'चिकन नेक'जवळ आर्थिक तळ स्थापन करण्याचे निमंत्रण देत आहेत. युनूस म्हणाले की, भारतातील ईशान्येकडील सात राज्ये (सेव्हन सिस्टर्स) अजूनही लँड लॉक, अर्थात सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेली आहेत. व्हिडिओमध्ये, युनूस दावा करतात की, बांग्लादेश हा या प्रदेशातील महासागराचा (हिंद महासागर) एकमेव संरक्षक आहे. भारतातील ईशान्याकडील सात राज्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. आम्ही या संपूर्ण प्रदेशासाठी महासागराचे एकमेव संरक्षक आहोत. त्यामुळे चिनी अर्थव्यवस्था येथे विस्तारू शकते, असेही युनूस व्हिडिओत म्हणाले.

काय आहे चिकन नेक?चिकन नेक हा भारतातील ईशान्येकडील राज्ये (सेव्हन सिस्टर्स) – नागालँड, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूर यांना देशाच्या इतर भागांशी जोडणारा भाग आहे. याला सिलीगुडी कॉरिडॉर म्हणूनही ओळखले जाते. हा कॉरिडॉर भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, या भागात चीनच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. चिकन नेक बांग्लादेशच्या सीमेवरून जातो आणि युनूसने चीनला या भागात व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यास भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.

युनूस यांचा चीन दौरा  मोहम्मद युनूस चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या भेटीदरम्यान त्यांनी चीनकडे नदी जल व्यवस्थापनासाठी 50 वर्षांचा मास्टर प्लॅन मागितला. यामध्ये तीस्ता नदीचे पाणी व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे, ज्याचे पाणी देखील भारताने सामायिक केले आहे. तीस्ता नदीच्या पाण्यावरून भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरू आहेत. नदीच्या जल व्यवस्थापनाच्या मास्टर प्लॅनबद्दल बोलताना युनूस यांनी चीनला ‘पाणी व्यवस्थापनाचा मास्टर’ म्हटले. 

युनूस यांच्या चीन दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी सागरी सहकार्य वाढविण्याचे आणि गरज पडल्यास त्यावर चर्चा करण्याचे मान्य केले आहे. बांग्लादेश मोंगला बंदर सुविधांच्या आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी चीनी कंपन्यांसमोर हात पसरत आहे. बांग्लादेशच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, चीनने बांग्लादेशच्या दक्षिण-पश्चिम मोंगला बंदराच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे $400 दशलक्ष, चीन औद्योगिक आर्थिक क्षेत्राच्या विकासासाठी $350 दशलक्ष आणि तांत्रिक सहाय्य म्हणून $150 दशलक्ष देण्याची योजना आखली आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतchinaचीन