भारताच्या मदतीचे हात प्रशांत सागरापर्यंत
By Admin | Updated: November 20, 2014 01:40 IST2014-11-20T01:40:30+5:302014-11-20T01:40:30+5:30
भारताने बुधवारी प्रशांत महासागरातील देशांपर्यंत आपला मदतीचा हात पोहोचवला असून, फिजी या देशाच्या विकासासाठी मदत व कर्ज असे मिळून भारताकडून ८० दशलक्ष डॉलरची मदत वाढविण्यात आली आ

भारताच्या मदतीचे हात प्रशांत सागरापर्यंत
सुवा : भारताने बुधवारी प्रशांत महासागरातील देशांपर्यंत आपला मदतीचा हात पोहोचवला असून, फिजी या देशाच्या विकासासाठी मदत व कर्ज असे मिळून भारताकडून ८० दशलक्ष डॉलरची मदत वाढविण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनीमिरामा यांची भेट घेतली. प्रशांत महासागरातील या देशासाठी १ कोटी डॉलरचा विशेष निधी मोदी यांनी जाहीर केला.
सुवामध्ये मोदी यांचे जोरदार स्वागत झाले. ‘वुला मोदी’ (मोदींचे स्वागत) असे फलक जागोजाग लावले होते. या भेटीत मोदी यांनी प्रशांत महासागरातील १२ देशांची बैठक घेतली. फिजीच्या विद्यापीठात मोदी गेले. या विद्यापीठाला भेट देणारे मोदी हे पहिले जागतिक नेते ठरले.
प्रशांत महासागरातील १२ देशांसाठी आयटीपीओच्या प्रदर्शनात जागा ठेवण्याचे तसेच नवी दिल्ली येथे व्यापारी कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले. प्रशांत महासागरातील देशांना दिली जाणारी १ लाख २५ हजार डॉलरची मदत २ लाख डॉलरपर्यंत वाढविण्यात आली. भारत व फिजी यांच्या संबंधातील ही नवी सकाळ आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षांचा बहिष्कार
नरेंद्र मोदी यांचे भाषण फिजीच्या संयुक्त संसदेसमोर झाले. येथील विरोधी पक्षाने या भाषणावर बहिष्कार टाकला. फिजी सरकारने विरोधी पक्षांचा धन्यवाद प्रस्ताव मांडण्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी भाषणावर बहिष्कार टाकला. पण फिजीचे पंतप्रधान वॉरेक बैनीमिरामा यांनी या बहिष्काराबद्दल माफी मागितली व विरोधकांचे हे वागणे अक्षम्य असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी, मी फिजीच्या जनतेच्या वतीने आपली जाहीर माफी मागतो, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
हे वर्तन अक्षम्य आहे. या प्रकाराचा भारत व फिजी यांच्या संबंधावर कोणताही परिणाम होणार नाही. आमच्यापैकी काहीजणांना लोकशाही, शासन कला व राष्ट्रीय धर्म याबाबत आणखी धडे देण्याची गरज आहे, हेच या घटनेने दाखवले आहे.
१९८१ नंतर फिजीला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. १९८१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी फिजीला आल्या होत्या.