शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:05 IST

महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदर वगळता, इतर सर्व भूमार्ग आणि बंदरांमधून बांगलादेशातून येणाऱ्या 'या' उत्पादनांना आता भारतात प्रवेश मिळणार नाही.

भारतानेबांगलादेशातून येणाऱ्या ताग (Jute) आणि संबंधित फायबर उत्पादनांच्या आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंधात सध्या वाढलेला तणाव पाहता, भारताने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी (२८ जून २०२५) हा निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदर वगळता, इतर सर्व भूमार्ग आणि बंदरांमधून बांगलादेशातून येणाऱ्या ताग उत्पादनांना आता भारतात प्रवेश मिळणार नाही.

DGFTकडून बंदीची अधिसूचना जारीवाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) शुक्रवारी (२७ जून) ही बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली. SAFTA (दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र) करारांतर्गत बांगलादेशच्या ताग उत्पादनांना भारतात शुल्कमुक्त प्रवेश मिळत होता. मात्र, सूत्रांनी सांगितले की, बांगलादेशातून येणाऱ्या ताग उत्पादनांच्या, विशेषतः धागा, फायबर आणि पिशव्यांच्या 'डंपिंग' (कमी किमतीत मोठ्या प्रमाणात विक्री) आणि अनुदानित आयात (सरकारकडून मदत मिळवून) यामुळे भारतीय ताग उद्योगाला बऱ्याच काळापासून मोठा फटका बसत आहे.

अँटी-डंपिंग शुल्काचाही उपयोग नाही!बांगलादेश सरकारकडून मिळणाऱ्या राज्य अनुदानाचा (State Subsidy) फायदा बांगलादेशी जूट निर्यातदारांना मिळत असल्याचे पुरावे भारताकडे आहेत. यावर उपाय म्हणून, अँटी-डंपिंग अँड अलाइड ड्युटीज डायरेक्टोरेट जनरलने (DGAD) यापूर्वी सविस्तर चौकशी करून बांगलादेशातून येणाऱ्या जूट आणि इतर वस्तूंवर अँटी-डंपिंग ड्युटी (ADD) लादली होती. मात्र,यानंतरही आयातीत कोणतीही घट झालेली नाही.

विविध अनुदानांव्यतिरिक्त, बांगलादेशी निर्यातदार अनेकदा गैरव्यवहार करत आहेत. यामध्ये तांत्रिक सवलतींचा फायदा घेऊन अँटी-डंपिंग ड्युटी टाळणे, चुकीचे लेबलिंग करणे, ADDमधून सूट मिळालेल्या कंपन्यांद्वारे निर्यात करणे आणि जास्त अनुदान मिळवण्यासाठी चुकीची घोषणा करणे यासारख्या गैरप्रकारांचा समावेश आहे. यामुळे भारताच्या जूट उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे.

साफ्टा कराराने बांगलादेशला भारतात शुल्कमुक्त प्रवेश दिला असला तरी, बांगलादेशातून येणाऱ्या अनुदानित आणि स्वस्त जूट उत्पादनांमुळे भारतीय उद्योगाला मोठा तोटा सहन करावा लागत होता. यावरच आता भारताने बंदी घालून बांगलादेशाला मोठा धक्का दिला आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशbusinessव्यवसायIndiaभारत