शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशाची नाचक्की करणा-या 'या' भारतीयांना विदेशात झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 18:48 IST

आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक झाल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याची सुटका करण्यात आली. ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्याला लंडनमध्ये दुस-यांदा अटक झाली.

मुंबई - आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक झाल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याची सुटका करण्यात आली. ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्याला लंडनमध्ये दुस-यांदा अटक झाली. याआधी 13 जून रोजी विजय मल्ल्याला अटक करण्यात आली होती. भारताने विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याची विनंती केल्यानंतर ही अटकेची कारवाई झाली होती. विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. 

 

अबू सालेम अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला 20 सप्टेंबर 2002 रोजी पोर्तुगालच्या लिस्बन शहरातून अटक करण्यात आली होती. अभिनेत्री मोनिका बेदीलाही त्याच्यासोबत अटक करण्यात आली होती. मुंबईतील 1993 साखळी बॉम्बस्फोटाची मालिका आणि गुलशन कुमार हत्या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अबू सालेमला फाशी होणार नाही या अटीवर पोर्तुगालने त्याचे प्रत्यापर्ण केले होते. अबू सालेमचं खासगी आयुष्य हे एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा वेगळं नाही. अभिनेत्री मोनिका बेदीसोबतचे त्याचे प्रेम प्रकरण बरेच गाजले. 

छोटा राजनमुंबई अंडरवर्ल्डमध्ये दरारा असलेल्या छोटा राजनला 26 ऑक्टोंबर 2015 रोजी इंडोनेशियाच्या बाली बेटावरील एका रिसॉर्टमधून अटक करण्यात आली. दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार अशी राजनची ओळख होती. मुंबईमध्ये राजनच्या नावाचा एक दरारा होता. पण 1993 मध्ये दाऊद टोळीशी फिस्कटल्यानंतर राजनने स्वत:ची टोळी उभारुन दाऊदला टक्कर दिली. 2015 मध्ये भारताकडे हस्तांतरण करण्यात आले. राजनवर सध्या विविध गुन्ह्यांप्रकरणी खटला सुरु आहे. 

श्रीधर पोटाराझू

अमेरिकेतील प्रसिद्ध भारतीय वंशाचे डॉक्टर श्रीधर पोटाराझू यांना काही महिन्यांपूर्वी आर्थिक घोटाळा प्रकरणी अमेरिकन न्यायालयाने दहावर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कंपनीच्या शेअर होल्डर्सची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होते. श्रीधर पोटाराझू नेत्र तज्ञ आहेत. अमेरिकेत स्थायिक असलेल्या भारतीयांसाठी ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करायचे. 

रजत कुमार गुप्ता

भारतीय वंशाचे प्रसिद्ध अमेरिकन बिझनेसमॅन रजत कुमार गुप्ता यांना अमेरिकेत इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात दोन वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. गोल्डमॅन साच्स अशा बडया कंपन्यांच्या बोर्डवर त्यांनी काम केले होते. 

 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या