शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:11 IST

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. या दोन्ही देशात हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू राबवले आहे.

मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात हल्ले वाढवले आहेत. दरम्यान, आता या दोन्ही देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू राबवले. या अंतर्गत आज इराणमध्ये अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांना विमानाने भारतात आणले आहे. 

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे पहिले विमान गुरुवारी आर्मेनियातील येरेवन येथून नवी दिल्लीत पोहोचले. 'तेहरानमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाच्या सहकार्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. "भारतीय दूतावासाच्या मदतीने, तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर काढण्यात आले आहे",असं या निवेदनात म्हटले आहे. 

इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय विद्यार्थी १८ जून रोजी येरेवनच्या झ्वार्टनॉट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका विशेष विमानाने निघाले. १९ जून रोजी सकाळी हे विमान नवी दिल्लीत उतरले. यापूर्वी, भारताने इराणमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये याची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "भारताने इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. भारत परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो."

भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी इराण आणि आर्मेनियाने केलेल्या मदतीचे भारतीय अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, यामुळे अडकलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये विमानतळ बंद आहेत. यानंतर, भारताने इराणला नागरिकांच्या परतीसाठी सीमेवर सुरक्षित मार्ग देण्याची विनंती केली होती.

इराणने ही विनंती मान्य केली. यानंतर, विद्यार्थ्यांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या शेजारील देशांमधून निघून जाण्याचा सल्ला देण्यात आला. भारतीय दूतावासाने इराणमध्ये नियंत्रण कक्ष देखील सुरु केले आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलIndiaभारत