शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांनो, ना घंटा वाजेल, ना गवत उगवेल; पाकिस्तानची भारताला अणुबॉम्बची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:13 IST

शेख रशीद सभेत म्हणाले की, पाकिस्तान मरायला आणि मारायला तयार आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागले असून, लोकांची अवस्था अतिशय वाईट आहे. १ किलो पिठासाठी १ किलोमीटर लांबीच्या रांगा लावल्या जात आहेत. असे असूनही पाकिस्तानी राजकारणी मात्र भारतावर अणुबॉम्बने हल्ला करण्याची धमकी देत आहेत. 

पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला धमकी दिली आहे. भारतीयांनो, बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही आणि भारतात गवतही उगणार नाही, असे म्हणत अहमद यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे.

शेख रशीद सभेत म्हणाले की, पाकिस्तान मरायला आणि मारायला तयार आहे. मी म्हणालो, भारतीयांनो, आमच्याकडे असे मसाले आहेत की, त्यामुळे बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही, ना भारतात गवत उगवेल. संपूर्ण जगाला मी जाहीर करू इच्छितो की आपण उपाशी राहू. आपण नग्न होऊ, अनवाणी पायाने फिरू, मात्र आम्ही २४ कोटी जनता पाकिस्तानसाठी लढेल आणि मरेलही. 

यापूर्वीही दिला इशारा

२०१९ मध्ये अहमद यांनी कलम ३७० हटवल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली होती. आमच्याकडे भरभरून अणुबॉम्ब आहेत, आम्हाला पाहिजे तिथे आम्ही हल्ला करू शकतो, असे ते म्हणाले होते. शेख रशीद अहमद हे इम्रान खान यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत.  त्यांनी पाकिस्तानचे ३८ वे गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. याआधी ते रेल्वेमंत्रीही राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानी रेल्वेची अवस्था अत्यंत वाईट होती.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानnuclear warअणुयुद्धNarendra Modiनरेंद्र मोदी