फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची प्रसिद्ध पॉडकास्टर राज शमानीने घेतलेल्या मुलाखतीत भारतफ्रान्स संबंध, तंत्रज्ञान सहाय्य, जागतिक समतोल आणि अमेरिका-चीन यांच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारावर भाष्य केले. इमॅन्युअल मॅक्रॉन नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ही मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.
या मुलाखतीत इमॅन्युअल मॅक्रॉन यांना भारत आणि फ्रान्स जगासमोर मैत्रीचं नवं उदाहरण मांडतायेत का असा प्रश्न केला होता. त्यावर मॅक्रॉन म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढत आहे. त्यात विविध प्रमुख क्षेत्रांमध्ये सातत्याने भागीदारी होतेय. भारतासोबत सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा चांगले परिणाम मिळतात यावर माझा खरोखर विश्वास आहे असं त्यांनी सांगितले.
धोरणात्मक स्वायत्तता आणि संतुलित जागतिक संबंध
फ्रान्स किंवा भारत दोघेही एकाच महासत्तेवर अवलंबून राहू इच्छित नाहीत. आम्हाला दोन प्रमुख शक्तींपैकी एकावर अवलंबून राहायचे नाही. आम्हाला अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांशी चांगले संबंध राखायचे आहेत. भारत आणि फ्रान्सचे या दोन्ही देशांशी वेगवेगळे संबंध आहेत. आम्ही या दृष्टिकोनाचे समर्थन करतो असं मॅक्रॉन यांनी म्हटलं.
भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्सचा संदेश
पॉडकास्ट दरम्यान मॅक्रॉन यांनी भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये येण्याचे आमंत्रणही दिले. मी भारतीय विद्यार्थ्यांना संदेश देऊ इच्छितो की जर तुम्ही फ्रान्समध्ये आलात तर तुम्हाला उच्च दर्जाच्या विद्यापीठे आणि संस्थांमध्ये प्रवेश मिळेल. फ्रान्स इंग्रजी भाषेच्या शिक्षणासाठी भरपूर संधी देते. फ्रान्स मोठ्या कंपन्या, प्रतिष्ठित संस्था आणि युरोपमधील सर्वात गतिमान स्टार्टअप आणि इनोव्हेशन इकोसिस्टमपैकी एक निर्माण करतो. फ्रान्स गेल्या काही वर्षांपासून भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संशोधन क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वेगाने वाढत आहे असं मॅक्रॉन यांनी सांगितले.
Web Summary : President Macron invites Indian students to France, highlighting quality education, English language programs, and thriving tech and innovation sectors. He emphasized strengthening Indo-French cooperation across various fields, aiming for balanced global relations, independent of any single superpower.
Web Summary : राष्ट्रपति मैक्रों ने भारतीय छात्रों को फ्रांस आने का निमंत्रण दिया, गुणवत्तापूर्ण शिक्षा, अंग्रेजी भाषा कार्यक्रमों और संपन्न तकनीक और नवाचार क्षेत्रों पर प्रकाश डाला। उन्होंने भारत-फ्रांस सहयोग को मजबूत करने पर जोर दिया, जिसका लक्ष्य किसी एक महाशक्ति से स्वतंत्र, संतुलित वैश्विक संबंध बनाना है।