पक्ष्याला भारतीय शास्त्रज्ञाचे नाव

By Admin | Updated: November 26, 2014 02:38 IST2014-11-26T02:38:13+5:302014-11-26T02:38:13+5:30

इंडोनेशियातील बेटांवर 15 वर्षापूर्वी शेवटचा आढळलेला पक्षी आता पुन्हा दिसला असून, त्याला भारतीय वंशाचे दिवंगत पक्षीविद्यातज्ज्ञ नवज्योत सोधी यांचे नाव देण्यात आले आहे.

Indian scientist's name to the bird | पक्ष्याला भारतीय शास्त्रज्ञाचे नाव

पक्ष्याला भारतीय शास्त्रज्ञाचे नाव

वॉशिंग्टन : इंडोनेशियातील बेटांवर 15 वर्षापूर्वी शेवटचा आढळलेला पक्षी आता पुन्हा दिसला असून, त्याला भारतीय वंशाचे दिवंगत पक्षीविद्यातज्ज्ञ नवज्योत सोधी यांचे नाव देण्यात आले आहे. 
हा पक्षी सुलावेसी जंगलात शेवटचा दिसला होता. याच्या गळ्य़ावर ठिपके असून त्याची शेपटी आखूड आहे. त्याच्या अंगावर रेषा असून तो त्याचे खाद्य हवेतच पकडतो. हवेत आपले खाद्य पकडणा:या अन्य पक्ष्यांच्या तुलनेत सुलावेसी सोधी पिसे, शरीराची ठेवण, आवाज आणि आनुवंशिकतेत खूपच वेगळा आहे, असे संशोधकांचे म्हणणो आहे. जगातील 98 टक्के पक्ष्यांचे वर्णन करण्यात आलेले आहे. सुलावेसी सोधी हा स्थलांतर करणारा आहे. नवा पक्षी सापडणो हे खरोखरच दुर्मिळ आहे, असे प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे जे. बर्टन सी. हॅरिस यांनी सांगितले.
 

 

Web Title: Indian scientist's name to the bird

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.