शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधला नवा ग्रह...पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्षे दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 12:23 PM

या नव्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा 27 पट आहे.

चेन्नई- अंतराळ विज्ञानामध्ये भारतीय संशोधकांनी नेहमीच महत्त्वाचे शोध लावलेले आहेत. आता अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजेच पीआरएल या संस्थेतील संशोधकांनी एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्षे दूर आहे.

अहमदाबादच्या संशोधकांनी शोधलेल्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या 27 पट आहे तर या ग्रहाची त्रिज्या पृथ्वीच्या सहापट आहे. या संशोधकांच्या मते हा ग्रह सूर्याच्या भोवती एखाद्या ताऱ्याप्रमाणे फिरत आहे असे पीआरएलच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.माऊंट अबू येथील गुरुशिखर येथील 1.2 मी दुर्बिण आणि भारतीय बनावटीच्या पीआरएव अॅडव्हान्स रॅडिकल वेलॉसिटी अबू स्काय सर्च म्हणजेच पारस या स्पेक्टोग्राफ या दोन्हींच्या मदतीने हा शोध लावला आहे. हा शोध लावल्यामुळे ग्रह शोधणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीमध्ये भारताने स्थान मिळवले आहे. या ग्रहाचे नाव एपिक 211945201 किंवा के2-236 असे नाव आहे. या ग्रहाचे तापमान 600 अंश सेल्सियस इतके असून एखाद्या तप्त ताऱ्याप्रमाणे त्याचे तापमान आहे.  तो त्याच्या जवळच्या ताऱ्यापेक्षा लात पट मोठा आहे. त्याच्यावर अधिवास शक्य नाही.

टॅग्स :scienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय